dasara gold esakal
Personal Finance

Dussehra gold prices: दसऱ्याला सोन्याची झळाळी, सोनेखरेदीसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी, काय आहे आजचा सोन्याचा भाव?

Gold rates on Dussehra 2024 : आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी नागरिकांनी सोने खरेदीची आवड जपली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई,ता. १२: दसरा हा भारतीय सणांमधील सर्वात महत्त्वाचा सण आणि चांगला मुहूर्त मानला जातो. या सणाच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा आपल्याकडे आहे. दसऱ्याला सोनं लुटा म्हणत आपट्याची पानं दिली जातात. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी संपूर्ण मुहूर्त आणि शुभ मुहूर्त असतो. त्यामुळे, दसऱ्याला आवर्जून सोनं खरेदी केलं जातं. मुंबईतही दसऱ्याच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे विशेष शुभ मानले जाते. दरम्यान, आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी नागरिकांनी सोने खरेदीची आवड जपली आहे.

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी सोन्याची किंमत ७७ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. उच्च शुद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदीदारांसाठी, 22 कॅरेट सोने, जे त्याच्या मिश्र धातुच्या रचनेमुळे अधिक टिकाऊ आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदी 97,000 रुपये प्रति किलोवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT