Wholesale Inflation Sakal
Personal Finance

Wholesale Inflation : घाऊक महागाईचा उच्चांक, पंधरा महिन्यांतील सर्वोच्च दर; मे महिन्यात २.६१ टक्क्यांवर

घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई सलग तीन महिन्यांपासून वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक महागाईचा दर २.६१ टक्क्यांवर पोहोचली असून, हा गेल्या १५ महिन्यांतील उच्चांक आहे. उष्णतेच्या लाटेमुळे खाद्यपदार्थ, विशेषत: भाजीपाला आणि अन्य जीवनावश्यक उत्पादनांच्या किमती वाढल्याने महागाई वाढल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाई सलग तीन महिन्यांपासून वाढत आहे. मागील महिन्यात ती १.२६ टक्के होती, तर मे २०२३ मध्ये ती उणे ३.६१ टक्के होती. मे २०२४ मध्ये महागाई दरातील वाढ प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किमती, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, खनिज तेल, आदींच्या किंमतवाढीमुळे झाली आहे.

यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये घाऊक महागाईने ३.८५ टक्क्यांचा दर गाठत, उच्चांक नोंदवला होता. सरकारी आकडेवारीनुसार, मे महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई ९.८२ टक्क्यांवर पोहोचली असून, हा दहा महिन्यांतील उच्चांक आहे.

मे महिन्यात भाज्यांची महागाई ३२.४२ टक्के होती, जी आधीच्या महिन्यात २३.६० टक्क्यांनी वाढली होती. कांद्याची भाववाढ ५८.०५ टक्के, तर बटाट्याची भाववाढ ६४.०५ टक्के होती. मे महिन्यात डाळींच्या महागाईत २१.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

याशिवाय, जागतिक धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने उत्पादन श्रेणीतील महागाई वाढण्यास हातभार लागला आहे. उत्पादनांमध्ये, मे महिन्यात महागाईचा दर ०.७८ टक्के होता, जो एप्रिलमधील उणे ०.४२ टक्क्यांपेक्षा जास्त होता. इंधन आणि उर्जा क्षेत्रातील महागाईचा दर १.३५ टक्क्यांवर आला आहे, एप्रिलमधील १.३८ टक्क्यांपेक्षा त्यात किरकोळ घट झाली आहे.

देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहिल्याने, जूनमध्येही भाज्या आणि फळांच्या किमतीत वाढ होत आहे, त्यामुळे नजीकच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सूनची प्रगती अन्नधान्य महागाईचा मार्ग निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल,

- आदिती गुप्ता, अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT