Wipro layoffs Hundreds of mid-level employees to lose jobs Sakal
Personal Finance

Wipro layoff: विप्रो कंपनीतील 100हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?

The jobs of more than 100 employees in the Wipro company are at risk: स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचारी कपातीनंतर भारताच्या तंत्रज्ञान उद्योगातील नोकऱ्याही कमी होऊ शकतात. भारतीय आयटी कंपनी विप्रोने सांगितले की, कंपनी आपला व्यवसाय आणि कौशल्य बदलत्या बाजाराच्या वातावरणाशी जुळवून घेत आहे.

राहुल शेळके

Wipro layoff: स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचारी कपातीनंतर भारताच्या तंत्रज्ञान उद्योगातील नोकऱ्याही कमी होऊ शकतात. भारतीय आयटी कंपनी विप्रोने सांगितले की, कंपनी आपला व्यवसाय आणि कौशल्य बदलत्या बाजाराच्या वातावरणाशी जुळवून घेत आहे.

वृत्तानुसार, विप्रो आपले मार्जिन वाढवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे. विश्लेषकांच्या मते, विप्रोच्या उत्पन्नापैकी 55 टक्के ऑफशोअर कर्मचाऱ्यांचा आणि 45 टक्के ऑन-साइट कर्मचाऱ्यांचा वाटा आहे.

ऑनलाइन कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा खर्च होत आहे. त्यामुळे कंपनीतील 100 हून अधिक मध्यम-स्तरीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे.

विप्रोच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी, कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि वेगाने बदलणारे ग्राहक आणि बाजाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत राहू.'

देशातील पहिल्या चार आयटी कंपन्यांमध्ये विप्रोचे मार्जिन सर्वात कमी आहे. डिसेंबर तिमाहीत विप्रोचे मार्जिन 16 टक्के होते, जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकपेक्षा कमी आहे.

कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट

अलीकडेच, विप्रोने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत, सलग पाचव्या तिमाहीत विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत 4,473 कमी कर्मचारी होते. डिसेंबर तिमाहीत कंपनीची कर्मचारी संख्या 2,40,234 आहे. (Reduction in number of employees)

दरम्यान, आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी विप्रोच्या शेअरचा भाव 475 रुपये होता. व्यवहारादरम्यान शेअर ग्रीन झोनमध्ये होता. गेल्या 15 फेब्रुवारीला हा शेअर 526.45 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT