World Inequality Report Sakal
Personal Finance

Inequality India: भारतात 85 टक्के अब्जाधीश उच्च जातीतील; अनुसूचित जमातीतील एकही व्यक्ती नाही, काय आहे अहवालात?

World Inequality Report: देशातील अब्जाधीशांच्या संपत्तीपैकी जवळपास 85 टक्के संपत्ती उच्चवर्णीयांच्या हातात आहे. देशातील एकूण अब्जाधीशांच्या संपत्तीत उच्च जातीतील लोकांचा वाटा 85 टक्के आहे.

राहुल शेळके

World Inequality Report: देशातील अब्जाधीशांच्या संपत्तीपैकी जवळपास 85 टक्के संपत्ती उच्चवर्णीयांच्या हातात आहे. देशातील एकूण अब्जाधीशांच्या संपत्तीत उच्च जातीतील लोकांचा वाटा 85 टक्के आहे. World Inequality Labमधील संशोधकांच्या अहवालानुसार, 2022 मध्ये अब्जाधीशांच्या यादीत अनुसूचित जातीचे लोक फक्त 2.6 टक्के होते, तर सवर्ण जातीचे लोक 88.4 टक्के होते.

न्यूयॉर्क विद्यापीठाचे नितीन कुमार भारती, हार्वर्ड केनेडी स्कूलचे लुकास चॅन्सल आणि पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे थॉमस पिकेट्टी आणि अनमोल सोमांची यांचा 'भारतातील कर न्याय आणि संपत्ती पुनर्वितरण' हा अहवाल मे महिन्यात प्रकाशित झाला. या वर्षी, अब्जाधीशांच्या वर्गात इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) वाटा केवळ 9 टक्के आहे. या यादीत अनुसूचित जमाती (एसटी) समुदायातील एकाही अब्जाधीशाचा यात समावेश नाही.

जातीनिहाय डेटा गोळा करण्यासाठी, संशोधकांनी सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या अब्जाधीशांच्या यादीचा अभ्यास केला आणि त्यावर अहवाल तयार केला. देशातील अब्जाधीशांच्या यादीतील मागासवर्गीयांचा वाटा कमी होत आहे, तर सवर्णांचे वर्चस्व वाढत असल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते.

सोमांची म्हणाले, वास्तविकता अशी आहे की, देशात जे अब्जाधीश आहेत, ते मोठ्या प्रमाणावर उच्च जातीतील आहेत. देशाच्या अनेक भागांत दलितांना केवळ मालमत्तेपासून वंचित ठेवले गेले नाही, तर त्यांना जमिनी आणि बाजारपेठांपासूनही वंचित ठेवण्यात आले. त्याचा सर्वात वाईट परिणाम त्यांच्या आर्थिक प्रगतीवर झाला.

अझीम प्रेमजी विद्यापीठाने तयार केलेल्या ‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2023’ या अहवालानुसार, उद्योग किंवा व्यवसायांचे मालक म्हणून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा वाटा कामगार दलातील त्यांच्या संख्येच्या तुलनेत कमी आहे.

कामगार दलात अनुसूचित जातीचा वाटा 19.3 टक्के आणि उद्योजकतेमध्ये 11.4 टक्के आहे. त्याचप्रमाणे, अनुसूचित जमातीचे लोक 10.1 टक्के कामगार आहेत, तर या श्रेणीतील लोकांपैकी केवळ 5.4 टक्के लोक उद्योगांचे मालक आहेत.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, अनुसूचित जातीतील लोकांपैकी केवळ 12.3 टक्के लोक उच्च श्रीमंत वर्गात आहेत, तर या वर्गातील अनुसूचित जमातीचा वाटा 5.4 टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT