Zerodha AMC, founder Nithin Kamath Sakal
Personal Finance

Zerodha: सरकारने नितीन कामथ यांच्यासह कंपनीतील बड्या अधिकाऱ्यांवर केली कारवाई; काय आहे कारण?

Nithin Kamath: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.

राहुल शेळके

Zerodha Asset Management: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. वेळेवर मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांची (सीएफओ) नियुक्ती केली नाही त्यामुळे मंत्रालयाने झिरोधा कंपनीतील सर्व संचालकांना दंड ठोठावला आहे.

झिरोधा एएमसी सीएफओशिवाय काम करत होती

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 31 जुलै रोजी हा आदेश जारी केला आहे. यानुसार, झिरोधा एएमसीने कंपनी कायदा, 2013 च्या कलम 203 चे उल्लंघन केले आहे. या अंतर्गत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल असलेल्या कंपन्यांना सीएफओ पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करणे आवश्यक आहे.

पण, कंपनी सीएफओशिवाय काम करत होती. झिरोधा एएमसीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांना 4.08 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सर्व अधिकाऱ्यांना दंड ठोठावला

याशिवाय राजन्ना भुवनेशवर 5 लाख रुपये, झिरोधा एएमसीचे सीईओ विशाल वीरेंद्र जैन यांना 3.45 लाख रुपये, कंपनी सेक्रेटरी शिखा सिंगवर 3.45 लाख रुपये, नित्या इसवरन यांना 1.5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कंपनीचे सीएफओ हे पद 459 दिवसांपासून रिक्त

Zerodha AMC ने मार्च 2023 मध्ये चिंतन भट्ट यांची कंपनीचे CFO म्हणून नियुक्ती केली होती. त्यापूर्वी ते कंपनी कायद्याचे पालन करत नव्हते. या दिरंगाईमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की कंपनीचे सीएफओ पद 20 डिसेंबर 2021 ते 23 मार्च 2023 पर्यंत म्हणजेच 459 दिवस रिक्त होते. झिरोधा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दंड भरण्यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कंपनीचे संचालक स्वत:च्या पैशातून दंड भरतील, असे आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT