Share Market 
Sakal Money

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

Sensex Closing Bell: गुरुवारी शेअर मार्कट चढ-उतारानंतर हिरव्या रंगात बंद झाला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गुरुवारी शेअर मार्कट चढ-उतारानंतर हिरव्या रंगात बंद झाला आहे. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 676.69 (0.92%) अंकांनी वाढून 73,663.72 अंकावर बंद झाला. तर, एनएसई निफ्टी 203.30 (0.92%) अंकांनी वाढून 22,403.85 वर पोहोचला आहे. शेअर मार्केटमध्ये अनेक शेअर्स हिरव्या रंगामध्ये बंद झाले. गुरुवारी एमएंडएमचे शेअर्स ३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले,तर इंफोसिसचे शेअर्स २ टक्क्यांनी वाढले.

गुरुवारी जवळपास 1 टक्क्यांच्या वाढीसह शेअर मार्केट बंद झाला असं म्हणता येईल. जागतिक पातळीवर असलेल्या सकारात्मक संकेताच्या जोरावर काही अंशी ही वाढ पाहायला मिळाली. जपानच्या Nikkei ने 1.37 टक्क्यांची वाढ नोंदवली, तर कोरियाच्या KOSPI ने 0.82 टक्क्यांची वाढ नोंदवली. दुसरीकडे, युरोपातील शेअर मार्केटमध्ये अर्ध्या टक्क्यांनी पडझड पाहायला मिळाली. पण, त्याचा फारसा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला नाही.

Share Market 16 may 2024

सेन्सेक्स 351 अंकाच्या वाढीसह सुरु झाला. बुधवारी सेन्सेक्स 72,987.03 वर बंद झाला होता. पण, सुरुवातीची वाढ जास्त काळ टिकली नाही. सेन्सेक्समध्ये 457 अंकांनी घसरण झाली. सेन्सेक्स 72,529.97 पर्यंत खाली गेला होता. पण, शेवटच्या टप्प्यात पुन्हा वाढ झाली. सेन्सेक्स 677 अंकांनी वाढला आणि 73,663.72 वर बंद झाला. म्हणजे सेन्सेक्सने 0.93 टक्क्यांची वाढ नोंदवली.

निफ्टी-50 22,319.20 अकांनी सुरु झाला. बुधवारी तो 22,200.55 वर बंद झाला होता. दिवसभरात निफ्टीने 22,432.25 पर्यंत कमाल पातळी आणि 22,054.55 पर्यंत किमान पातळी नोंदवली. त्यानंतर 203 अंकांनी वाढ नोंदवत 22,403.85 वर तो बंद झाला. म्हणजे निफ्टीने 0.92 टक्क्यांची वाढ नोंदवली. मिड आणि स्मॉल इंडेक्सने चांगली कामगिरी केली. BSE मिडकॅप इंडेक्स 1.07 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप इंडेक्स 0.85 अंकांनी वाढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT