Bajaj Finserv Ltd share stock analysis investment share market sakal
Share Market

Bajaj Finserv Ltd : बजाज फिनसर्व्ह (शुक्रवारचा बंद भाव : रु. २०१०)

बजाज फिनसर्व्ह लि. ही बजाज समूहाच्या विविध वित्तीय सेवा व्यवसायांची होल्डिंग कंपनी आहे. कंपनीच्या अंतर्गत बजाज फायनान्स, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स; तसेच बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स या तीन प्रमुख कंपन्या येतात.

भूषण गोडबोले

बजाज फिनसर्व्ह लि. ही बजाज समूहाच्या विविध वित्तीय सेवा व्यवसायांची होल्डिंग कंपनी आहे. कंपनीच्या अंतर्गत बजाज फायनान्स, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स; तसेच बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स या तीन प्रमुख कंपन्या येतात.

‘बजाज फायनान्स’ कर्जपुरवठा, ‘बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स’ सर्वसाधारण विमा सेवा आणि ‘बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स’ आयुर्विमा सेवा पुरवते. याशिवाय ‘बजाज फिनसर्व्ह डायरेक्ट’, ‘बजाज फिनसर्व्ह हेल्थ’ आणि ‘बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंट’ अशा काही नव्या व्यवसायांमध्येही कंपनीचा सहभाग आहे.

गेल्या तिमाहीत कंपनीने उल्लेखनीय आर्थिक कामगिरी केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षभरात कंपनीच्या निव्वळ नफ्यात सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे एकूण एकत्रित उत्पन्न वर्षभरात ३५ टक्क्यांनी वाढून ३१,४८० कोटी रुपये झाले आहे. कंपनीचा ‘कॅपिटल टू इन्कम’ रेशो सुधारत आहे.

कंपनीच्या भविष्यातील वाढीच्या दृष्टीने कंपनीने आपल्या प्रमुख व्यवसायांमध्ये विविधता आणण्याचा; तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचा निर्धार केला आहे. ‘बजाज फायनान्स’ने नवे कर्ज वितरण मॉडेल आणत विविध प्रकारची कर्जे ग्राहकांना दिले आहेत.

‘बजाज फायनान्स’ने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २६ ते २८ टक्के मालमत्ता व्यवस्थापन (एयूएम) वाढीचे लक्ष्य ठेवले आहे. विमा व्यवसायाच्या दृष्टीने ‘बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स’ आणि ‘बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स’ यांनी ग्राहकांसाठी विविध विमा योजनांची वाढ केली आहे. ‘बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स’ने २४ टक्के वाढ दाखवून ४,७६१ कोटी रुपये ग्रॉस रिटर्न प्रीमियम नोंदविला आहे.

कंपनीचे नवे उपक्रम जसे, की ‘बजाज फिनसर्व्ह हेल्थ’ आणि ‘बजाज फिनसर्व्ह डायरेक्ट’, डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि इतर संधींचा विस्तार करत आहेत. नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचे धोरण; तसेच डिजिटल विस्तारावर भर यामुळे कंपनीची बाजारातील स्थिती अधिक मजबूत होत आहे.

वित्तीय सेवा क्षेत्रात भारतातील वाढत्या मागणीमुळे ‘बजाज फिनसर्व्ह’ला दीर्घकालीन वाढीसाठी एक उत्कृष्ट संधी मिळू शकते. ऑक्टोबर २०२१ मध्ये १९३२ रुपयांचा उच्चांक नोंदविल्यानंतर जुलै २०२२ पर्यंत शेअरने १०७२ रुपयापर्यंत घसरण दर्शविली होती. यानंतर आलेखानुसार शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला.

गेल्या महिन्यात आलेखानुसार १९३२ रुपये या पातळीच्या वर शेअरने बंद देऊन दीर्घावधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. दीर्घावधीमधील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elephants Padma Menaka Dhruv : नांदणीनंतर 'या' मठांचे ३ हत्तीही जाणार? हायकोर्टाकडून नोटीस, शेडबाळ मठाच्या हत्तीचा समावेश

'माझ्यासाठी सिनेमा अनेक वर्ष पुढे ढकलला' पिळगांवकरांनी काढली दिग्दर्शकाची आठवण, म्हणाले,'माझ्यासोबत चित्रपट करणं त्यांची शेवटची इच्छा..'

Mumbai Local Viral Photo : एसी लोकलमध्ये प्रवाशाचा भन्नाट कारनामा; चक्क ट्रेनमध्ये छत्री उघडून प्रवास करतानाचा फोटो व्हायरल!

Beed News: कोरोनातली उधळपट्टी चौकशीच्या फेऱ्यात; बारा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, सकाळ’ने वृत्तमालिकेतून टाकला होता प्रकाश

Ahilyanagar News: 'डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागेची पाहणी प्रक्रियेला गती'; राजकीय श्रेयावरून वादाची ठिणगी

SCROLL FOR NEXT