Grindwell Norton Ltd Sakal
Share Market

Grindwell Norton Ltd : ग्रिंडवेल नॉर्टन (शुक्रवारचा बंद भाव : रु. २६१२)

१० वर्षांचा विचार करता ही कंपनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने दरवर्षी २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे.

भूषण गोडबोले

ग्रिंडवेल नॉर्टन ही कंपनी ॲब्रेसिव्ह, ग्राइंडिंग व्हील, सिरॅमिक्स, प्लॅस्टिक उत्पादन आणि आयटी सेवा पुरवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. या कंपनीची स्थापना १९५० मध्ये झाली. ही कंपनी पॅरिसमध्ये मुख्यालय असलेली आंतरराष्ट्रीय समूह ‘सेंट गोबेन’च्या उपकंपन्यांपैकी एक आहे.

ही कंपनी बॉन्डेड अॅब्रेसिव्ह, कोटेड अॅब्रेसिव्ह, पातळ चाके आणि सुपर अॅब्रेसिव्हची संपूर्ण श्रेणी तयार करते. स्टील, बेअरिंग्ज, ऑटो अॅन्सिलरीज, ऑटो ओएम, कटिंग टूल्स, नीडल, रेझर, फूड प्रोसेसिंग, एरोस्पेस, जनरल इंजिनिअरिंग आदी उद्योगांद्वारे तिच्या उत्पादनांचा वापर केला जातो.

कंपनीचे उत्पादन प्रकल्प मुंबईजवळ मोरा, तिरुपती, नागपूर, हिमाचल प्रदेशातील बातेड व हलोल येथे आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मागणी असलेल्या सिलिकॉन कार्बाइडची ती प्रमुख पुरवठादार आहे.

गेल्या तीन वर्षांत कंपनीने भविष्यासाठी क्षमताविस्तार, संपादन, संशोधन व विकास आदींमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे. आगामी चार ते पाच वर्षांत कंपनीला महसूल दुप्पट करण्याची मोठी संधी आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीचा सध्या निव्वळ नफा ९३ कोटी रुपयांवर पोहोचला असून, आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील एकूण निव्वळ नफा ३८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या १० वर्षांचा विचार करता ही कंपनी धंद्यात गुंतविलेल्या भांडवलावर सातत्याने दरवर्षी २० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत आहे.

यशस्वीरित्या नफ्याची धंद्यात पुनः गुंतवणूक करून कंपनी व्यवसायवृद्धी करत आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता जोखीम लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharia law : 'सत्तेत आल्यास देशात शरिया कायदा लागू करणार, हिंदूंसह मुस्लिमांना देणार अधिकार'; फैजुल करीम यांचं वादग्रस्त विधान

Shaktipeeth Highway : सतेज पाटील, राजू शेट्टींचे ‘शक्तिपीठ’विरोधात विठ्ठलाला साकडे

Ashadhi Wari 2025 : पुण्याहून पंढरपूरसाठी ३२५ अतिरिक्त बस, गाड्या शनिवारी, रविवारी धावणार; नियंत्रण कक्ष स्थापन

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

SCROLL FOR NEXT