Adani Group Sakal
Share Market

Adani Group: अदानी समूहाच्या व्यवहारांची सेबीद्वारे चौकशी; आता अदानींच्या भावावर...

बाजार नियामक सेबीने अदानी समूहाच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे.

राहुल शेळके

Guatam Adani: अदानी समूहाच्या अडचणी अजूनही थांबलेल्या नाहीत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले होते, त्यानंतर अदानी समूहावर कर्ज फेडण्यासाठी दबाव आला होता.

त्यानंतर केनच्या अहवालाने अदानींना मोठा धक्का दिला आणि आता बाजार नियामक सेबीने अदानी समूहाच्या व्यवहारांची चौकशी करणार आहे.

रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की भारतीय बाजार नियामक गौतम अदानी यांच्या भावाशी संबंधित असलेल्या अदानी समूहासोबतच्या तीन कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. सेबी या संस्थांसोबतच्या गैर व्यवहारांची चौकशी करत आहे. (Hindenburg impact Sebi investigating some Adani offshore deals for possible rule violations, says report)

तीन संस्थांनी गेल्या 13 वर्षांत गौतम अदानी यांच्या पोर्ट-टू-पॉवर समूहाच्या असूचीबद्ध युनिट्ससह अनेक गुंतवणूक व्यवहार केले आहेत. अहवालानुसार, सेबीने आपल्या तपासात विनोद अदानी एकतर त्या तीन कंपन्यांचे फायदेशीर मालक आहेत किंवा संचालक आहेत याचा शोध घेत आहे. सेबी 'रिलेटेड पार्टी ट्रांजेक्शन' नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करत आहे.

'रिलेटेड पार्टी ट्रांजेक्शन' नियम काय आहे?

'रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन' म्हणजे एखाद्या कंपनीने स्वत:च्या कोणत्याही कंपनीसोबत व्यवहार केल्यास तो या नियमाचे उल्लंघन मानला जातो.

कंपनीने विनोद अदानी यांना प्रमोटर म्हणून सांगितले आहे :

सेबीच्या ई-मेलची माहिती अदानी समूहाने दिलेली नाही. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत अदानी तपासावर भाष्य करण्यास नकार दिला. त्याचवेळी, अदानी समूहाने दिलेल्या निवेदनात विनोद अदानी हे केवळ अदानी समूहाचे प्रमोटर असल्याचे म्हटले आहे.

अदानी समूहाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विनोद अदानी हे अदानी कुटुंबाचे सदस्य आहेत आणि समूहाचा भाग आहेत. परंतु ते अदानी समूहामधील कोणत्याही सूचीबद्ध संस्था किंवा त्याच्या उपकंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय पदावर नाही. अमेरिकन शॉर्ट-सेटर हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारीला दिलेल्या अहवालानंतर अदानी समूहावर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मुंबईत मुसळधार पावसाचा आढावा, उपमुख्यमंत्री शिंदे यांची आपत्कालीन कक्षास भेट

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास दिली भेट

Tejashwi Yadav : ''महाआघाडी 2029मध्ये राहुल गांधींना पंतप्रधान बनवणार'' ; तेजस्वी यादव यांनी केली घोषणा, मात्र...

Mumbai Rain Update: डोंबिवली रस्ते पाण्याखाली, खासदारांच्या घरातही पाणी शिरलं, पाहा परिस्थिती

Asia Cup 2025 India Squad: शुभमन गिलमुळे यशस्वी जैस्वालवर अन्याय? सूर्यकुमार यादवने सांगितलं का केलं त्याला उपकर्णधार

SCROLL FOR NEXT