Hyundai India IPO Sakal
Share Market

Hyundai India IPO: LICचा विक्रम मोडणार! Hyundai आणणार देशातील सर्वात मोठा IPO; सेबीने दिली मंजुरी

Hyundai India IPO: भारतीय शेअर बाजाराच्या तेजीत आयपीओ बाजारातील उत्साह कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बाजारात दर आठवड्याला अनेक नवीन IPO लाँच होत आहेत आणि गुंतवणूकदारांना कमाईच्या संधी मिळत ​​आहेत.

राहुल शेळके

Hyundai India IPO: भारतीय शेअर बाजाराच्या तेजीत आयपीओ बाजारातील उत्साह कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. बाजारात दर आठवड्याला अनेक नवीन IPO लाँच होत आहेत आणि गुंतवणूकदारांना कमाईच्या संधी मिळत ​​आहेत. दरम्यान, आता एलआयसीचा सर्वात मोठा आयपीओचा विक्रम मोडीत निघणार आहे. देशांतर्गत बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO लवकरच येणार आहे.

SEBI ने Hyundai च्या IPO ला मान्यता दिली

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai लवकरच तिच्या स्थानिक युनिटचा IPO घेऊन येत आहे. Hyundai India च्या IPO प्रस्तावाला बाजार नियामक SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, Hyundai किंवा सेबीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

Hyundai India ही भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेतील टॉप-3 कंपन्यांपैकी एक आहे. भारतीय बाजारपेठेत IPO लॉन्च करण्यासाठी कंपनीने 3 महिन्यांपूर्वी बाजार नियामक सेबीकडे मसुदा दाखल केला होता. Hyundai India ने प्रस्तावित IPO साठी JP Morgan, Citigroup, HSBC सारख्या अनेक बड्या बँकर्सना व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे.

Hyundai चा IPO इतका मोठा असू शकतो

यापूर्वी, रॉयटर्सने काही महिन्यांपूर्वी आपल्या एका अहवालात दावा केला होता की Hyundai India च्या प्रस्तावित IPO चा आकार 3 अब्ज डॉलर असू शकतो. भारतीय चलनात हा आकार 25 हजार कोटींहून अधिक आहे.

सध्या, भारतीय बाजारपेठेत सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याचा विक्रम सरकारी विमा कंपनी LIC कडे आहे, ज्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी मे 2022 मध्ये 21 हजार कोटी रुपयांचा IPO लॉन्च केला होता. म्हणजेच Hyundai Indiaचा IPO येताच LICच्या नावावर असणारा सर्वात मोठ्या IPO चा विक्रम मोडीत निघेल.

दोन दशकांनंतर कार कंपनीचा IPO येत आहे

जवळपास दोन दशकांनंतर भारतीय बाजारपेठेत कार कंपनीचा IPO येणार आहे. कार कंपनीचा शेवटचा IPO 2003 मध्ये आला होता, जेव्हा मारुती सुझुकी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली होती. Hyundai च्या एकूण जागतिक व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठेला विशेष महत्त्व आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियानंतर भारतीय बाजारातून सर्वाधिक कमाई होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT