Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Today: सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सलग तिसऱ्या व्यापार सत्रात वाढीसह बंद झाले आणि निफ्टी 25,900 च्या वर जाताना दिसला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 384.30 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांनी वाढून 84,928.61 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय इक्विटी इंडेक्स सलग तिसऱ्या व्यापार सत्रात वाढीसह बंद झाले आणि निफ्टी 25,900 च्या वर जाताना दिसला. व्यवहाराच्या सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 384.30 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांनी वाढून 84,928.61 वर आणि निफ्टी 148.05 अंकांनी म्हणजेच 0.57 टक्क्यांनी वाढून 25,939 वर बंद झाला.

जर आपण सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर PSU बँक इंडेक्स 3 टक्क्यांहून अधिक वाढला. त्याच वेळी, रियल्टी इंडेक्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तर ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, मेटल, फार्मा, मीडिया 0.5-1 टक्क्यांनी वधारले. मात्र, आयटी इंडेक्स 0.5 टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी 0.7 टक्क्यांनी वाढले.

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती?

मजबूत गॅप-अप ओपनिंगसह, इंडेक्स विस्तृत श्रेणीत चढ-उतार झाला आणि शेवटी 148.10 अंकांच्या वाढीसह 25,939.05 च्या विक्रमी उच्चांकावर बंद झाल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. आयटी वगळता इतर सर्व क्षेत्रांत वाढ नोंदवली गेली. पीएसयू बँका आणि रिॲल्टी शेअर्सनी सर्वाधिक चांगली कामगिरी केली.

लहान आणि मध्यम शेअर्सकडे बाजाराचा कल परत आला आहे. मिडकॅपमध्ये 0.84 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर स्मॉलकॅपमध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मिड आणि स्मॉल कॅप्सने फ्रंटलाइन इंडेक्सपेक्षा जास्त कामगिरी केली.

गेल्या 2 ट्रेडिंग सत्रातील मजबूत रॅली पाहता, शेअर्स शॉर्ट्ससाठी ओवरबॉट झालेला दिसतो. अशा स्थितीत बाजारात प्रॉफिट बुकींग दिसू शकते. आता निफ्टीला 25,800-25,850 च्या झोनमध्ये मजबूत सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • ओएनजीसी (ONGC)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • एसबीआ लाइफ (SBILIFE)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • आयडिया (IDEA)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • आयडिएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT