IPO Open
IPO Open sakal
Share Market

IPO Open : वार्या क्रिएशनच्या आयपीओमध्ये करा 25 एप्रिलपर्यंत गुंतवणूक, अधिक जाणून घेऊयात...

सकाळ वृत्तसेवा

ज्वेलरी कंपनी वार्या क्रिएशन लिमिटेडचा आयपीओ (Varya Creations Limited) आयपीओ 22 एप्रिलपासून खुला झाला आहे. 25 एप्रिलपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना असेल. या इश्यूच्या माध्यमातून 20.10 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या आयपीओमध्ये कंपनीने इश्यूची ऑफर किंमत 150 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या अंतर्गत, 20.10 कोटीचे 13.40 लाख फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जातील. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कोणतीही विक्री होणार नाही. म्हणजे कंपनीला संपूर्ण आयपीओचा फंड मिळेल.

या आयपीओसाठी 1000 शेअर्सची लॉट साइज निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार किमान 1000 शेअर्ससाठी आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 1 लाख 50 हजार गुंतवावे लागतील. वार्या क्रिएशनच्या आयपीओचे रजिस्ट्रार बीगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत. कंपनीचे प्रमोटर श्रीमती पूजा विनीत नाहेटा आणि श्रीमती सारिका अमित नाहेटा आहेत. सबस्क्रिप्शननंतर, 26 एप्रिलला यशस्वी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल. त्याच वेळी, रिफंड प्रक्रिया 29 एप्रिलपासून सुरू होईल. 29 एप्रिलला यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. याशिवाय, बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंगची अंदाजे तारीख 30 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे

वार्या क्रिएशन लिमिटेडची स्थापना 2005 मध्ये झाली. ही कंपनी सोने, चांदी, मौल्यवान खडे आणि अर्ध-मौल्यवान दगडांच्या घाऊक व्यापारात व्यवहार करते. त्याच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये नेकलेस, कानातले, टॉप, रिंग, ब्रेसलेट, बांगड्या, रत्न, हिरे, लब२-ग्रोन डायमंड आणि मोती यांचा समावेश आहे. कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टम-मेड ज्वेलरी देखील बनवते. पोर्टफोलिओ ग्राहकांना सर्व प्रसंगांसाठी आणि किंमतींसाठी दागिन्यांच्या डिझाइनची श्रेणी ऑफर करतो.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT