Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips (Top Shares): मंगळवारी चढ-उताराच्या दरम्यान सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद झाले. 2 जुलैच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो आणि बँक शेअर्सवर दबाव दिसून आला. तर आयटी शेअर्समध्ये वाढ झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी चढ-उताराच्या दरम्यान सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद झाले. 2 जुलैच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो आणि बँक शेअर्सवर दबाव दिसून आला. तर आयटी शेअर्समध्ये वाढ झाली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 34.74 अंकांनी अर्थात 0.04 टक्क्यांनी घसरून 79,441.45 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 18.20 अंकांच्या म्हणजेच 0.08 टक्क्यांच्या घसरणीसह 24,123.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजाराने ट्रेडिंग सत्राची सुरुवात 24,230 च्या आणखी एका विक्रमी उच्चांकावर केली, पण मिड आणि स्मॉलकॅप सेगमेंटमधील घसरणीमुळे इंडेक्स दिवसभर मर्यादित रेंजमध्ये राहिल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे आदित्य गग्गर यांनी सांगितले. निफ्टी 18.10 अंकांच्या घसरणीसह 24,123.85 वर बंद झाला. आयटी सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली.

त्यानंतर मीडिया सेक्टरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. दुसरीकडे, पीएसयू बँकांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 0.78 टक्के आणि 0.45 टक्क्यांनी घसरले. त्यांनी फ्रंटलाइन इंडेक्समध्ये कमजोर कामगिरी केली.

मार्केटमध्ये काहीही बदललेले नाही, अपट्रेंड मजबूत सुरू असल्याचे ते म्हणाले. अशा परिस्थितीत, घसरणीवर खरेदी करणे हे एक आदर्श धोरण असेल. 24,000 च्या पातळीवर निफ्टीला सपोर्ट आहे. तर 24,230 च्या पातळीवर रझिस्टंस दिसून येत आहे.

सुरुवातीच्या व्यापारात नवीन आशांमुळे बाजाराने नवीन उच्चांक गाठला पण तो वरच्या पातळीवर टिकून राहू शकला नसल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. त्यानंतर इंडेक्स निगेटीव्ह झोनमध्ये गेला. कमजोर युरोपियन आणि आशियाई संकेत तसेच डाओ फ्युचर्समधील निगेटीव्ह सेंटीमेंटमुळे बँकिंग, टेलिकॉम आणि ऑटो शेअर्समध्ये प्रॉफीट बुकींगला प्रोत्साहन मिळाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • आयडिया (IDEA)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT