Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात तेजी असताना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Share Market Investment Tips: बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 21,450 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 689.76 अंकांच्या अर्थात 0.98 टक्क्यांच्या वाढीसह 71,060.31 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी अस्थिर व्यापार सत्रात बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 21,450 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 689.76 अंकांच्या अर्थात 0.98 टक्क्यांच्या वाढीसह 71,060.31 वर बंद झाला आणि निफ्टी 215.20 अंकांच्या म्हणजेच 1.01 टक्क्यांच्या वाढीसह 21,454 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी 50 इंडेक्सने एक पियर्सिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला आहे जो तेजीचा सिग्नल असल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. यासह निफ्टी आरएसआयने हिडन बुलिश डायव्हर्जन्ससह बुलीश सायफर पॅटर्न तयार केला आहे आणि कल बदलण्याचे संकेत दिले आहेत.

आता निफ्टीसाठी 21,500 वर रझिस्टंस दिसत आहे. त्यानंतर पुढील रझिस्टंस 21,700 वर आहे. तर त्याला सपोर्ट 21,200 च्या पातळीवर दिसत आहे.

निवडक शेअर्सच्या वाढीमुळे केवळ घसरण रोखली गेली नाही तर निफ्टीला हिरव्या रंगात बंद होण्यास मदत झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले.

बँकिंग इंडेक्सने बुधवारी त्याच्या लाँग टर्म मूव्हिंग एव्हरेज (200 EMA) टेस्ट केली, त्यामुळे कंसोलीडेशन नाकारू शकत नाही. निफ्टीमधील इतर महत्त्वाच्या सेक्टर्समध्येही मोठी रिकव्हरी होण्याची शक्यता कठीण दिसत असल्याचे ते म्हणाले.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • पीएफसी (PFC)

  • पॉलिकॅब (POLYCAB)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

SCROLL FOR NEXT