Investment Tips in marathi Which 10 shares perform today  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजार महाराष्ट्र दिनानिमित्त बंद होता. त्याआधी अत्यंत अस्थिर सत्रात मंगळवारी आयटी, मेटल, मीडिया, ऑईल अँड गॅस कंपन्यांमधील विक्रीमुळे बाजाराने सर्व इंट्राडे नफा गमावला आणि घसरणीसह बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): बुधवारी शेअर बाजार महाराष्ट्र दिनानिमित्त बंद होता. त्याआधी अत्यंत अस्थिर सत्रात मंगळवारी आयटी, मेटल, मीडिया, ऑईल अँड गॅस कंपन्यांमधील विक्रीमुळे बाजाराने सर्व इंट्राडे नफा गमावला आणि घसरणीसह बंद झाला. अखेर, सेन्सेक्स 188.50 अंकांनी अर्थात 0.25 टक्क्यांनी घसरून 74,482.78 वर बंद झाला. निफ्टी 38.60 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 22,604.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला ज्याचे कारण मागील स्विंग हायजवळ त्याला रझिस्टंसचा सामना करावा लागल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे यांनी सांगितले. त्यामुळे बाजारात घसरण दिसून आली.

इतर इंडिकेटर जसे की 20-डे सिंपल मूव्हिंग एव्हरेज (SMA) आणि 50-डे एसएमए हे इंडेक्स व्हॅल्यूपेक्षा खाली दिसत आहेत. यावरुन सकारात्मक कल कायम राहू शकतो असे संकेत मिळत आहेत. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) देखील तेजीचा क्रॉसओवर दर्शवत आहे.

पुढील काही दिवसांत, हेडलाइन इंडेक्समधील कल 22,783 च्या सर्वकालीन उच्चांकाच्या वर ब्रेकआउट देईपर्यंत साईडवेज राहू शकतो. तो घसरल्यास, 22,500 वर सपोर्ट दिसत आहे. इंडेक्सच्या खाली गेल्यास आणखी घसरण होऊ शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • डॉ. रेड्डी (DRREDDY)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • पीआय इंडस्ट्रीज लिमिटेड (PIIND)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • आयडीया (IDEA)

  • कोफोर्ज (COFORGE)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT