Share Market  esakal
Share Market

Share Market Investment: 20 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्याधीश, आता एका डीलमुळे शेअर्स तेजीत

Share Market Investment: कंपनीचे शेअर्स 25 जुलै 2003 रोजी फक्त 4.38 रुपयांना मिळत होते.

शिल्पा गुजर

Share Market Investment: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता असतानाही कंझ्युमर गुड्स कंपनी मॅरिकोच्या (Marico) शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे. सध्या मॅरिकोचे शेअर्स जवळपास 4 टक्क्यांच्या तेजीसह 577.25 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकांवर ट्रेड करत आहेत.

या शेअर्समध्ये ही तेजी एका डीलमुळे होत आहे ज्या अंतर्गत त्याला त्याच्या प्लांट-बेस्ड न्यूट्रिशन ब्रँडच्या मूळ कंपनीमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी मिळेल.

मॅरिकोचा व्यवसाय हेल्थ, ब्युटी आणि वेलनेस सेगमेंटमध्ये आहे. त्याचा व्यवसाय भारताव्यतिरिक्त आशिया आणि आफ्रिकेतील 25 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे.

सतीया न्यूट्रास्युटिकल्समधील 58 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी करार केल्याचे मॅरिकोने सांगितले. एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही डील सुमारे 369.01 कोटी रुपयांची आहे.

'द प्लांट फिक्स-फ्लिक्स' या प्लाट बेस्ड न्युट्रिशन ब्रँडची मालकी सतीयाकडे आहे आणि आता मॅरिकोची सतीयामध्ये बहुसंख्य भागीदारी असेल. कंपनीने 32.75 टक्के भागभांडवल विकत घेतले आहे आणि उर्वरित 25.25 टक्के मे 2025 पर्यंत विकत घेतले जाईल असे समजते आहे.

मॅरिकोचे शेअर्स 25 जुलै 2003 रोजी फक्त 4.38 रुपयांना मिळत होते. आता ते 573.30 रुपयांवर पोहोचले आहेत, म्हणजेच 20 वर्षांत 77 हजारांच्या गुंतवणुकीने गुंतवणूकदार कोट्यधीश झाले.

20 एप्रिल 2023 रोजी त्याचे शेअर्स 462.95 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी नीचांकी आहे. यानंतर, 28 जुलै 2023 रोजी अवघ्या तीन महिन्यांत ते 23 टक्क्यांहून अधिक वाढून 571 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT