Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock: बोनस शेअर्ससह स्टॉक स्प्लिट जाहीर, गुंतवणूकदारांच्या पैशात 32 पट वाढ, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Multibagger Stock: बोनस शेअर्स शेअरधारकांना 9:5 च्या प्रमाणात जारी केले जातील.

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये मल्टीबॅगर स्टॉक्सवर गुंतवणुकदारांचा कायम फोकस असतो. असे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा देतात. अशात तुम्हीही चांगल्या मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर रेमेडियम लाईफकेअरच्या (Remedium Lifecare) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अतिशय कमी काळात उत्कृष्ट परतावा दिला आहे. कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांसाठी स्टॉक स्प्लिटसह बोनस शेअर जारी करण्याची घोषणा केली होती.

गेल्या शुक्रवारी कंपनीच्या शेअर्सचा एक्स बोनस स्टॉक म्हणून व्यवहार झाला. या दरम्यान शेअर्समध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट दिसले आणि शेअर 1,570.15 रुपयांवर पोहोचला. बोनस शेअर्स शेअरधारकांना 9:5 च्या प्रमाणात जारी केले जातील.

कंपनीने 1:2 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिटही जाहीर केले आहे. या अंतर्गत, 10 रुपये व्हॅल्यूचा एक शेअर प्रत्येकी 5 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या दोन शेअर्समध्ये विभागला जाईल.

स्प्लिटचा उद्देश लिक्विडीटी वाढवणे आणि रिटेल गुंतवणूकदारांना परवडणारा बनवणे हा आहे. स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

रेमिडियम लाईफकेअर शेअर्सची कामगिरी गेल्या एका महिन्यात सपाट राहिली आहे. पण गेल्या 6 महिन्यांत त्यांनी 1643% चा जबरदस्त परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 3051 टक्क्यांनी वधारले आहेत.

त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्यांनी 3103 टक्के परतावा दिला आहे. जानेवारी 2023 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 49 रुपये होती, जी आता काळात 1570 रुपये झाली आहे. म्हणजेच या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या पैशात 32 पटीने वाढ झाली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT