NTPC Renewable Energy wins bid for 900 mw solar projects share rise over 85 percent in 1 year  Sakal
Share Market

'या' सरकारी कंपनीने जिंकली 900 MW सोलर प्रोजेक्ट्ससाठीची बोली; 1 वर्षात दिला 85 टक्के परतावा

PSU Stock: एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने (NTPC Renewable Energy) 900 मेगावॅट सौर प्रकल्पांच्या डेव्हलपमेंटसाठी बोली जिंकली आहे. पीएफसी कन्सल्टिंग लिमिटेडने काढलेल्या निविदेत सरकारी मालकीच्या एनटीपीसीच्या युनिटने (NTPC Renewable Energy) बोली जिंकली.

राहुल शेळके

PSU Stock: एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने (NTPC Renewable Energy) 900 मेगावॅट सौर प्रकल्पांच्या डेव्हलपमेंटसाठीची बोली जिंकली आहे. पीएफसी कन्सल्टिंग लिमिटेडने काढलेल्या निविदेत सरकारी मालकीच्या एनटीपीसीच्या युनिटने (NTPC Renewable Energy) बोली जिंकली.

पीएसयू कंपनीच्या या शेअरने त्यांच्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. मागच्या एका वर्षाचा विचार केल्यास त्यांनी गुंतवणूकदारांना 85% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 302.75 रुपयांवर ट्रेड करत आहे.

एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने फ्लेक्सिबिलिटी स्कीमअंतर्गत भारतातील 1,250 मेगावॅट आयएसटीएस-कनेक्टेड सोलर पीव्ही पॉवर प्रोजेक्ट्स निवडले आहेत. एनटीपीसी लिमिटेडच्यावतीने जारी केलेल्या सोलर टेंडरमध्ये 900 मेगावॅट क्षमतेची बोली जिंकली आहे.

निविदेसाठी रिव्हर्स लिलाव पीएफसीसीएलने 21 डिसेंबरला आयोजित केला होता. डिस्कवर्ड टॅरिफ 2.53 रुपये प्रति kWh आहे आणि ऊर्जा निर्मिती खरेदी एनटीपीसी लिमिटेडद्वारे केली जाईल.

पीएसयू (PSU) कंपनी एनटीपीसी लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 20% वाढ झाली आहे. 6 महिन्यांत शेअरने 62% परतावा दिला. या वर्षी आतापर्यंत त्यात 80% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. एका वर्षात स्टॉकने 85% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT