IPO News Update  sakal
Share Market

IPO News Update : आधार हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित ; ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची घोडदौड

ब्लॅकस्टोन या खासगी इक्विटी फर्मची गुंतवणूक असलेल्या आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या (Aadhar Housing Finance) आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने 300-315 रुपयांचा प्राइस बँड प्रति शेअर निश्चित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

ब्लॅकस्टोन या खासगी इक्विटी फर्मची गुंतवणूक असलेल्या आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या (Aadhar Housing Finance) आयपीओसाठीचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. कंपनीने 300-315 रुपयांचा प्राइस बँड प्रति शेअर निश्चित केला आहे. आयपीओमधून 3,000 कोटी उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीचा आ यपीओ 8 मे रोजी उघडेल आणि 10 मे रोजी बंद होईल असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. या कालावधीत, 1,000 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि ब्लॅकस्टोन ग्रुप इंकची उपकंपनी असलेल्या बीसीपी टोपको 7 प्रायव्हेट लिमिटेडकडून 2,000 कोटीच्या विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल.

सध्या आधार हाउसिंगमध्ये बीसीपी टोपकोची 98.72 टक्के आणि आयसीआयसीआय बँकेची 1.18 टक्के भागीदारी आहे. बीसीपी टोपको पीटीई हा ब्लॅकस्टोन ग्रुपच्या संलग्न संस्थांद्वारे व्यवस्थापित केलेला निधी आहे. आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी लॉट साइज 47 शेअर्सची आहे. आयपीओ बंद झाल्यानंतर, 15 मे रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होऊ शकतात.

आधार हाऊसिंग फायनान्सने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) आपला अर्धा आयपीओ रिझर्व्ह ठेवला आहे. तर 15 टक्के हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित 35 टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 7 कोटीचे शेअर्स राखून ठेवले आहेत. आधार हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी एक दिवस आधी म्हणजेच 7 मे रोजी उघडेल. आयपीओ उघडण्याआधीच, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 28.57% च्या प्रीमियमने 315 ते 90 रुपयांच्या अपर प्राइस बँडमध्ये ट्रेडिंग करत आहेत.

कंपनी नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळालेले 750 कोटी भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहेत. उर्वरित रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायवेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल ऍडवायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायवेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे आधार हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पतीच्या प्रेमाची ‘कर’कहाणी! पत्नीला थेट ६.७५ कोटींची नोटीस आली, मुंबईतील धक्कादायक घटना

Bhorya Independence Day Speech Video : स्वातंत्र्यदिनानिमित्त भोऱ्यानं केलं पुन्हा एक तुफान भाषण; सोशल माडियावर प्रचंड व्हायरल!

Janmashtami 2025: श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल! 'ही' लोकप्रिय गाणी वापरून 'Instagram Reels' वर होईल लाइक्सचा वर्षाव

Sanjay Raut announcement: संजय राऊतांची मोठी घोषणा!, ठाकरे बंधू मुंबईसह ‘या’ महापालिका निवडणूक एकत्र लढवणार

Kangana Ranaut Marriage : मिस्ट्री मॅन, गुपचूप लग्न अन् आयुष्यात...; कंगना राणौतचा धक्कादायक खुलासा, म्हणाली प्रेमात सगळं...

SCROLL FOR NEXT