IPO Update
IPO Update sakal
Share Market

IPO Update : 5000 कोटीच्या आयपीओसाठी आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडला सेबीची मंजुरी...

प्रशांत पाटील

ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फर्म ब्लॅकस्टोन-समर्थित आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेडला (Aadhar Housing Finance Ltd) आयपीओसाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. या आयपीओद्वारे कंपनी 5,000 कोटी उभारणार असल्याचे समजतंय. मार्केट रेग्युलेटरने एका अपडेटद्वारे ही माहिती दिली. आधार हाउसिंग फायनान्सने फेब्रुवारीमध्ये आयपीओसाठी अर्ज केला होता आणि 5 एप्रिलला सेबीकडून एक निष्कर्ष पत्र मिळाले होते. आयपीओमधून मिळणारा फंड कंपनी कर्ज आणि सामान्य कॉर्पोरेट गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल, नोमुरा, सिटी आणि एसबीआय कॅपिटल सल्लागार आहेत.

ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), प्रस्तावित इश्यू अंतर्गत 1,000 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. यामध्ये 4,000 कोटीची ऑफर फॉर सेलही (OFS) समाविष्ट आहे. प्रमोटर बीसीपी टोपको-7 पीटीई लिमिटेड ओएफएसमध्ये आपला हिस्सा विकेल. सध्या बीसीपी टोपको यांच्याकडे आधार हाउसिंग फायनान्समध्ये 98.72% हिस्सा आहे.

रिटेल फोकस हाऊसिंग फायनान्स फर्म कमी-उत्पन्न गृहनिर्माण विभागात आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कमी ते मध्यम उत्पन्न असलेल्या ग्राहकांना ते सेवा पुरवतात. आधार हाउसिंग फायनान्स गहाण-संबंधित कर्ज उत्पादनांची श्रेणी ऑफर करते, ज्यामध्ये निवासी मालमत्ता खरेदी आणि बांधकामासाठी कर्जाचा समावेश आहे; होम इम्प्रूवमेंट आणि एक्सटेंशन लोन शिवाय कमर्शियल प्रॉपर्टी कंस्ट्रक्शन अधिग्रहणासाठीच्या कर्जाचाही यात समावेश आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, कंपनीकडे 91 सेल्स ऑफिससह 471 शाखांचे नेटवर्क आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT