Nifty 50, Sensex see deep cuts as investors lose about rs 3 lakh crore in a day  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात विक्री; सेन्सेक्स घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing: मंगळवारी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 30 अंकांनी घसरून 71,386 वर आला, जो इंट्राडे 72,035 वर गेला. निफ्टीही 21,724 वरून 21,544 वर घसरला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 9 January 2024: मंगळवारी शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 30 अंकांनी घसरून 71,386 वर आला, जो इंट्राडेमध्ये 72,035 वर गेला. निफ्टीही 21,724 वरून 21,544 वर घसरला.

बँकिंग, वित्तीय, मीडिया आणि एफएमसीजी क्षेत्रांचा बाजारावर दबाव होता. तर आयटी, ऑटो, मेटल, रियल्टी आणि फार्मा क्षेत्रात खरेदीची नोंद झाली.

निफ्टी मेटल इंडेक्स आज 0.80 टक्क्यांनी वधारला, आयटी निर्देशांक 0.43 टक्क्यांनी वधारला. ऑटो इंडेक्स 0.92 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय इन्फ्रा सेक्टर आणि एनर्जी सेक्टरचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. बँकिंग क्षेत्र आणि एफएमसीजी क्षेत्रावर आज विक्रीचा दबाव होता.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वाढले?

बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 14 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (L&T) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.55% वाढ झाली आहे. यानंतर भारती एअरटेल, एचसीएल टेक, टाटा मोटर्स आणि सन फार्मा यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील उर्वरित 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे शेअर्स 1.03 टक्क्यांनी घसरले. तर ITC, Nestle India, Asian Paints आणि Tech Mahindra चे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 1.08 लाख कोटी कमावले

BSE वर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 9 जानेवारी रोजी वाढून 367.48 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवारी 8 जानेवारी रोजी 366.40 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.08 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.08 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT