Sensex opens up 200pts, Nifty above 21700; NTPC top gainer, Nestle falls  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्स 72,100 पार, कोणते शेअर्स वाढले?

Share Market Opening: शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. 280 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्सने 72100 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीही 90 अंकांनी वाढून 21750 वर व्यवहार करत होता.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 5 January 2024: शुक्रवारी शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह उघडले. 280 अंकांच्या वाढीसह सेन्सेक्सने 72,100 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीही 90 अंकांनी वाढून 21,750 वर व्यवहार करत होता. ऑटो, मेटल आणि पीएसयू बँकिंग शेअर्समध्ये खरेदी होत आहे. एनटीपीसी निफ्टी टॉप गेनर आहे, तर नेस्ले टॉप लूझर आहे.

शेअर बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की बाजाराने लवचिकता दर्शविली आहे आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या या हंगामात बाजारात वाढ दिसून येईल.

आज सुरुवातीच्या व्यवहारात अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर आणि अदानी एंटरप्रायझेस या अदानी समूहाच्या तीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली.

मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये मुथूट फायनान्स, गार्डन रीच शिप बिल्डर, IRCTC, फेडरल बँक, ICICI बँक, SBI कार्ड, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, HDFC आणि पतंजली फूड्सचे शेअर्स वधारले.

तर जिओ फायनान्शियल, पटेल इंजिनीअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, एक्साइड इंडस्ट्रीज, एचडीएफसी लाइफ, कामधेनू, स्टोव्ह क्राफ्ट, ब्रँड कॉन्सेप्ट, युनि पार्ट्सचे शेअर्सही वाढले होते.

जागतिक बाजारात दबाव

या वर्षाच्या सुरुवातीपासून जागतिक बाजारावर दिसून आलेला दबाव अजूनही कायम आहे. गुरुवारी अमेरिकन बाजारात घसरण झाली. आज आशियाई बाजारात संमिश्र कल दिसून येत आहे. जपानचा निक्केई 0.46 टक्क्यांनी वर आहे, तर हाँगकाँगचा हँग सेंग घसरला आहे.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी 1,513.4 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) गुरुवारी 1,387.4 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT