Sensex, Nifty 50 Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराने मोडले सर्व रेकॉर्ड; सेन्सेक्स 1245 अंकांनी वधारला, टाटा स्टीलमध्ये जोरदार वाढ

Share Market Today: शुक्रवारी प्रमुख निर्देशांकांनी इंट्राडेमध्ये नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. पहिल्यांदा सेन्सेक्स 73,800 आणि निफ्टी 22,350 च्या पातळीवर होता. अखेरीस दोन्ही निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 March 2024: शुक्रवारी प्रमुख निर्देशांकांनी इंट्राडेमध्ये नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला. पहिल्यांदा सेन्सेक्स 73,800 आणि निफ्टी 22,350 च्या पातळीवर होता. अखेरीस दोन्ही निर्देशांक विक्रमी उच्चांकावर बंद झाले. सेन्सेक्स 1245 अंकांनी वाढून 73,745 वर आणि निफ्टी 355 अंकांनी वाढून 22,338 वर बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी मेटल सेक्टरमध्ये झाली.

Share Market Closing

सेन्सेक्स आणि निफ्टीने शुक्रवारी सकारात्मक व्यवहार करण्यास सुरुवात केली कारण यूएस बाजारातील तेजीचे संकेत आणि भारतातील अपेक्षित जीडीपी आकडे यामुळे बाजारात तेजी कायम राहिली. बँकिंग, फिनसर्व्हिसेस, मेटल, ऑटो निर्देशांकात सर्वाधिक वाढ झाली, तर फार्मा आणि आयटी निर्देशांकांवर विक्रीचा दबाव होता.

S&P BSE SENSEX

टाटा स्टीलमध्ये आज जोरदार वाढ झाली आणि ती 6.50 टक्क्यांनी वाढली, तर एल अँड टी 4.33 टक्क्यांनी वाढली आणि निफ्टी 50 टॉप गेनर्सच्या यादीत राहिले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, टायटनचे शेअर्सही 4 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

शेअर बाजाराच्या आजच्या वाढीमध्ये सर्वात मोठा वाटा बँकिंग शेअर्सचा आहे. निफ्टी बँक 2.53 टक्के आणि 1166 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्स तेजीसह बंद झाले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकातही वाढ दिसून आली आहे.

याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस सेक्टर्सचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर हेल्थकेअर, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप क्षेत्रातील शेअर्समध्येही वाढ दिसून आली. दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांनी 4.15 लाख कोटी रुपये कमावले

29 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,87,95,690.23 कोटी होते. आज म्हणजेच 1 मार्च 2024 रोजी तो 3,92,10,979.13 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 4,15,288.9 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सचे फक्त 4 शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी फक्त 4 शेअर्स आज रेड झोनमध्ये बंद झाले. आज सर्वात जास्त वाढ टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि एल अँड टी मध्ये झाली. दुसरीकडे, एचसीएल, इन्फोसिस आणि सन फार्मामध्ये आज सर्वाधिक घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT