share market  sakal
Share Market

Share Market Closing: तीन दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढला,'या' शेअर्समध्ये...

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Closing 19 May 2023: आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. BSE सेन्सेक्स जवळपास 300 अंकांच्या वाढीसह 61,729 वर बंद झाला आहे.

निफ्टीही 73 अंकांनी वर चढून 18,200 च्या पुढे बंद झाला आहे. बाजारात आयटी शेअर्समध्ये तेजीत होते. टेक महिंद्राचा शेअर 2.2 टक्क्यांनी वाढला. NSE वरील निफ्टी आयटी निर्देशांक 1.25 टक्क्यांनी वाढून बंद झाला.

आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी

सकाळी जोरदार सुरुवात होऊनही, बाजार इंट्राडेमध्ये 61,251 च्या नीचांकी पातळीवर घसरला होता. पण आशियाई आणि युरोपीय बाजारांमध्ये चांगले संकेतांमुळे सरतेशेवटी, बाजारातील हेवीवेट शेअर्सच्या खरेदीमुळे बाजार तेजीसह बंद झाला.

गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात विक्रीची नोंद झाली. BSE सेन्सेक्स 128 अंकांनी घसरून 61,431 वर आणि निफ्टी 52 अंकांनी घसरून 18,129 वर बंद झाला.

Share Market Closing 19 May 2023

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर फार्मा, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकही तेजीसह बंद झाले आहेत. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि 8 घसरणीसह बंद झाले, तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 30 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सच्या कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

आजच्या व्यवहारात टाटा मोटर्स 3.22 टक्के, टेक महिंद्रा 2.30 टक्के, इन्फोसिस 1.84 टक्के, एचसीएल टेक 1.31 टक्के, महिंद्रा 1.04 टक्के, विप्रो 0.88 टक्के वाढीसह बंद झाले.

एनटीपीसी 1.06 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.77 टक्क्यांनी, टायटन कंपनी 0.66 टक्क्यांनी आणि पॉवर ग्रिड 0.55 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:

आजच्या व्यवहाराच्या सत्रात बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप वाढून रु. 276.59 लाख कोटी झाले आहे, जे गुरुवारी रु. 275.85 लाख कोटी होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 74000 कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT