Share Market Sakal
Share Market

Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

सोमवारी शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: सोमवारी शेअर बाजार किंचित वाढीसह बंद झाला. मेटल वगळता सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून आली. मात्र, देशातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सपोर्टमुळे बाजारपेठेने स्वतःला सांभाळले.

अस्थिर व्यापार सत्रात भारतीय इक्विटी बेंचमार्क इंडेक्स किरकोळ वाढले. अखेर, सेन्सेक्स 63.72 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी वाढून 65344.17 वर बंद झाला आणि निफ्टी 24.10 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 19355.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

ट्रेडींग सत्राच्या उत्तरार्धात प्रॉफीट-बुकींगमुळे सुरुवातीचे फायदे गेल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. अस्थिर व्यापार सत्रात सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले.

या महिन्याच्या उत्तरार्धात अमेरिकेत फेडच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी बाजारपेठांमध्ये संभ्रम आहे. तथापि, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेड या महिन्यात दर वाढवेल असे संकेत मिळत आहेत.

तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास निफ्टीला 19435 च्या जवळ रझिस्टंसचा सामना करावा लागत आहे. अशात 19330 सपोर्टचे काम केले. ट्रेडर्ससाठी 19435 च्या ब्रेकआउटनंतरच नवीन तेजी शक्य आहे.

हा रझिस्टंस पार केल्यानंतर, निफ्टी 19500-19525 पर्यंत तेजी दाखवू शकतो. दुसरीकडे, 19330 च्या खाली गेल्यास नवीन विक्री दिसू शकते. याच्या खाली, निफ्टी 19250-19200 पर्यंत घसरू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

रिलायन्स (RELIANCE)

टाटा स्टील (TATASTEEL)

जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

भारती एअरटेल (BHARTIARTL)

एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

झिंदाल स्टील (JINDALSTEL)

भारत फोर्ज (BHARATFORG)

इंडियन हॉटेल (INDHOTEL)

एम फॅसिस (MPHASIS)

श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT