Share Market  Sakal
Share Market

Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय सांगतात तज्ज्ञ?

काल सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी भारतीय बेंचमार्क इंडेक्सने सलग पाचव्या सत्रात तेजी कायम राखली. सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली.

बाजाराच्या शेवटी, सेन्सेक्स 302.30 अंकांनी अर्थात 0.45 टक्क्यांनी वाढून 67,097.44 वर बंद झाला. निफ्टी 83.90 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी वाढून 19,833.20 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी 19964-20000 च्या लेव्हलला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू शकते असे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली आणि आवर्ली मोमेंटम वेगवेगळे सिग्नल देत आहेत.

यामुळे शॉर्ट टर्म कंसोलिडेशन होऊ शकते. मात्र, त्याची एकूण रचना तेजीच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. अशात 19740 - 19700 ची पातळी सपोर्ट झोन म्हणून काम करेल. तर 19964 - 20000 ची पातळी रझिस्टंसच्या रुपात काम करेल असे दिसत आहे.

बँक निफ्टी मागील ट्रेडिंग सत्राच्या (45906 - 45281) रेंजमध्ये कंसोलिडेट झाला. अशा प्रकारे एक इनसाईड बार पॅटर्न तयार होतो. बँक निफ्टीमध्ये वरच्या दिशेने ब्रेकआउटची होण्याची शक्यता आहे आणि बँक निफ्टीने 46500 पातळीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल असे सध्याचे चित्र दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • एनटीपीसी (NTPC)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • पीएनबी (PNB)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT