Share Market Sakal
Share Market

Share Market Today: बाजारातील सतत घसरणीच्या काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी? तज्ज्ञांनी सूचवले हे 10 शेअर्स

Share Market Tips: बँक निफ्टीमध्ये घसरण कायम आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: गुरुवारी बँक, मेटल, ऑईल अँड गॅस आणि रियल्टी शेअर्समधील घसरणीमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. पण फार्मा शेअर्समधील तेजीमुळे काहीशी रिकव्हरी दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 542.10 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरुन 65,240.68 वर बंद झाला. तर निफ्टी 144.80 अकांनी अर्थात 0.74 टक्क्यांनी घसरुन 19381.70 वर बंद झाला. खराब ग्लोबल संकेतांमुळे बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली.

पण त्यानंतर झालेल्या प्रॉफीट बुकींगमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी 65000 आणि 19300 च्या महत्त्वाच्या लेव्हलखाली घसरले. पण शेवटच्या सेशनमध्ये झालेल्या खरेदीमुळे बऱ्यापैकी रिकव्हरी झाली.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली आणि तो दिवसभर दबावात राहिल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी 145 अंकांनी घसरुन बंद झाला. डेली चार्ट सुचित करतो की निफ्टीवर विक्रीचा दबाव आहे. निफ्टी सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह बंद झाला.

निफ्टी खाली 19285 वरील 40 डीएमएजवळ सरकला आहे. ही लेव्हल निफ्टीसाठी इमिजिएट सपोर्ट लेव्हल म्हणून काम करेल. वरच्या बाजुला 19560 –19590 लेव्हलवर रझिस्टंस दिसत आहे.

बँक निफ्टीमध्येही घसरण कायम आहे. तो आपपल्या 40-डे मूविंग एव्हरेजच्या (44861) खाली बंद झाला, जो कमजोरीचे संकेत देतो. आतापर्यंत निफ्टीमध्ये बरीच घसरण झाली आहे, अशात पुलबॅक रॅलीची शक्यता नाकारता येत नाही. निफ्टी पुढे 45000 - 45200 पर्यंच जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • टायटन (TITAN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • टीव्हीएस मोटर्स (TVSMOTOR)

  • कमिन्स इंडिया (CUMMINSIND)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT