Share Market eSakal
Share Market

Share Market : 72 कोटींच्या ऑर्डरमुळे 'या' शेअरमध्ये दिसतेय मजबूत तेजी; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी काळात दमदार परतावा दिला आहे.

Sudesh

शेअर बाजारात मजबूत पोर्टफोलिओ असलेले शेअर्स तुम्हाला मालामाल करु शकतात. पण योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक न केल्यास मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. असेच दर्जेदार शेअर्स शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी वेदवाग सिस्टम्सचा (Vedavaag Systems) शेअर घेऊन आलो आहोत.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये दमदार परतावा दिला आहे. नुकतीच कंपनीला कोट्यवधी रुपयांची मोठी ऑर्डरही मिळाली आहे. त्यामुळेच वेदवाग सिस्टम्सच्या शेअर्समध्ये शुक्रवारी 8 टक्क्यांची मजबूत तेजी दिसून आली आणि तो 55.01 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 126.11 कोटी रुपये झाले आहे. (Share Market News)

वेदवाग सिस्टम्सला तब्बल 72 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला नवी दिल्लीच्या IRIS ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून ही ऑर्डर मिळाली आहे. या आदेशानुसार कंपनी आयपी बेस्ड व्हिडिओ सर्व्हिलंस सिस्टमचे (VSS) SITCM लागू करेल. या ऑर्डरमध्ये रेल्वेच्या पश्चिम विभागांतर्गत 1002 रेल्वे स्थानकांचा समावेश असेल.

या प्रकल्पामध्ये पश्चिम विभागातील डी अँड ई कॅटेगरीमधील रेल्वे स्थानकांवर सप्लाय, इंस्टॉलेशन, टेस्टींग, कमिशनिंग, विद्यमान व्हीएसएस इन्फ्रासह इंटीग्रेशन, आयपी बेस्ड व्हिडिओ सर्व्हिलंस सिस्टमचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स (SITCM) यांचा समावेश आहे. IRIS ग्लोबलला रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही ऑर्डर मिळाली आहे.

वेदवाग सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांत 27 टक्क्यांची मजबूत तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या तीन वर्षांत तब्बल 170 टक्के परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या जवळपास 10 वर्षांत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 615 टक्के नफा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी; घरझडतीत ५१ लाखांची रोकड जप्त

Ganesh Kale Murder Case: सोशल मीडियात गणेश काळेच्या हत्येचं समर्थन; बंदुकांसह काडतुसे सोबत ठेवून फोटो

Latest Marathi News Live Update : अतिवृष्टी पाहणीसाठी केंद्रीय पथक राज्यात

Mumbai: धक्कादायक! मुंबई कोर्टातच महिला वकिलाला हृदयविकाराचा झटका, लोक सीपीआर देण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात व्यस्त, दुर्दैवी मृत्यू

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT