Share Market Opening latest updates today 20 march 2023 bse nse sensex nifty
Share Market Opening latest updates today 20 march 2023 bse nse sensex nifty  Sakal
Share Market

Share Market Opening : आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening On 20 March 2023 : देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल आज खूपच मंद दिसत आहे. सेन्सेक्समध्ये सुरुवातीलाच 350 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीमध्येही बाजार उघडताच 17000 च्या खाली व्यवसाय होताना दिसत आहे. बँक निफ्टी 39300 च्या खाली आला आहे. आयटी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे शेअर बाजार कोसळला आहे.

आजच्या ओपनिंगमध्ये BSE सेन्सेक्स 216.38 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 57,773 स्तरावर व्यवहार करत होता. NSE चा निफ्टी 33.45 अंकांच्या म्हणजेच 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 17,066 च्या पातळीवर आहे. (Share Market Opening latest updates today 20 march 2023 bse nse sensex nifty)

सेन्सेक्स-निफ्टीची काय स्थिती आहे :

आज शेअर बाजाराची स्थिती वाईट दिसत असून सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 2 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे आणि 28 शेअर्समध्ये घसरण होताना दिसत आहे. निफ्टीमध्ये 50 पैकी फक्त 5 शेअर्स हिरव्या चिन्हात आहेत आणि 45 शेअर्स लाल चिन्हात आहेत.

सेन्सेक्सचे कोणते शेअर्स वाढत आहेत?

आज सेन्सेक्सचे फक्त 2 शेअर्स वर आहेत, ते म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टायटन. घसरलेल्या शेअर्समध्ये कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, एलअँडटी, नेस्ले, एनटीपीसी, भारती एअरटेल, अ‍ॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, आयटीसी, एचडीएफसी, सन फार्मा, मारुती, एचसीएल टेक आणि पॉवरग्रिड हे सर्वाधिक घसरले आहेत.

आयटी शेअर्समध्ये विक्री :

बाजाराच्या घसरणीत आयटी क्षेत्रातील शेअर्सचाही समावेश आहे. निफ्टी आयटी निर्देशांक 1% पेक्षा जास्त घसरला आहे. निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. यामध्ये इन्फोसिस आणि टीसीएसचे शेअर्स टॉप लूसर आहेत, जे 1-1 टक्क्यांनी घसरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT