share market  sakal
Share Market

Share Market Opening : शेअर बाजारात मोठी घसरण; फक्त 'या' तीन शेअर्समध्ये तेजी

अमेरिकन बाजारातील जोरदार घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही झाला आहे

सकाळ डिजिटल टीम

Share Market Opening : भारतीय शेअर बाजारांची आजची सुरुवात घसरणीने झाली आहे. अमेरिकन बाजारातील काल रात्रीच्या जोरदार घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही होत असून ते कमजोरीने उघडले. यूएस मार्केटबद्दल बोलायचे झाले तर काल 2023 च्या नीचांकी पातळीवर बंद झाला आहे.

असा उघडला बाजार :

आजच्या ओपनिंगमध्ये बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 280.86 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी घसरल्यानंतर 60,391.86 वर उघडला. दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 71.35 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 17,755.35 वर उघडला.

सेन्सेक्स-निफ्टी शेअर्सची स्थिती :

सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी फक्त 3 समभागांमध्ये तेजी दिसत आहे आणि हे समभाग म्हणजे सन फार्मा, एल अँड टी आणि एचयूएल. दुसरीकडे निफ्टी 50 पैकी फक्त 10 समभाग तेजीत आहेत आणि 40 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत.

'या' शेअर्समध्ये घसरण :

नेस्ले, अॅक्सिस बँक, आयटीसी, एमअँडएम, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, भारती एअरटेल, एनटीपीसी, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, टायटन, टीसीएस आणि कोटक महिंद्रा बँकेची नावे सेन्सेक्सवर सर्वाधिक घसरणीच्या यादीत आहेत.

निफ्टीच्या 'या' शेअर्समध्ये तेजी :

ज्या निफ्टी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे त्यात टाटा कंझ्युमर्स, बजाज ऑटो, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, कोल इंडिया, L&T, DV's Labs, Sun Pharma, Apollo Hospitals, Hindalco, Dr Reddy's Laboratories, HUL, Hero MotoCorp यांचा समावेश आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O) विभागात आज फक्त एका स्टॉकवर बंदी घालण्यात आली आहे आणि ती म्हणजे व्होडाफोन आयडिया.

NSE च्या मते, F&O विभागामध्ये या स्टॉकवर बंदी घालण्यात आली आहे. कारण त्याने मार्केट वाइड पोझिशन मर्यादेखाली 95 टक्के पातळी ओलांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT