Share Market latest updates today
Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Opening: जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण, आयटी शेअर्समध्ये...

राहुल शेळके

Share Market Opening 24 May 2023: बुधवारी शेअर बाजार घसरणीसह उघडला. BSE सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीनंतर 61750 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 50 अंकांच्या घसरणीसह 18300 च्या आसपास व्यवहार करत आहे.

आयटी आणि बँकिंगचे शेअर्स बाजारात विक्रीत आघाडीवर आहेत. NSE वर दोन्ही निर्देशांक प्रत्येकी अर्धा टक्का घसरणीसह व्यवहार करत आहेत.

हिंदाल्कोच्या शेअरमध्ये घसरण:

निकालापूर्वी, हिंदाल्कोचा शेअर दीड टक्क्यांनी घसरला आहे, जो निफ्टीमध्येही टॉप लूझर आहे. पॉवरग्रीडचा शेअर 1 टक्क्यांच्या वाढीसह निर्देशांकात व्यवहार करत आहे.

याआधी, मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी देशांतर्गत बाजार तेजीसह बंद झाले होते. काल BSE सेन्सेक्स 18 अंकांनी वधारून 61,981 वर बंद झाला आणि निफ्टी देखील 19 अंकांनी वधारून 18,333 वर बंद झाला.

Share Market Opening 24 May 2023

सुरुवातीच्या व्यवहारात बहुतेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली घसरण झाली आहे. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त 5 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते.

25 कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह व्यवहार करत होते. आयटी शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बँकिंग आणि फायनान्स शेअर्समध्ये घसरण होत आहे.

जागतिक बाजारात मोठी घसरण:

जागतिक बाजारातील आजच्या व्यवहारात घसरण दिसून येत आहे. मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.

Dow Jones Industrial Average 0.69 टक्क्यांनी, S&P 500 1.12 टक्क्यांनी घसरला, तर टेक-केंद्रित Nasdaq Composite Index 1.26 टक्क्यांनी खाली आला. आजच्या व्यवसायात, आशियाई बाजारांमध्येही असाच ट्रेंड दिसून येत आहे.

जपानचा निक्केई 0.46 टक्क्यांनी घसरला आहे. चीनचा शांघाय कंपोझिट 1.50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर हाँगकाँगचा हँगसेंग सुमारे 1.25 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी देखील 0.20 टक्क्यांनी घसरत आहे.

आज 24 मे रोजी हिंदाल्को इंडस्ट्रीज, नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स, ऑइल इंडिया, मून टेक्नॉलॉजीज, अशोक बिल्डकॉन, बायर क्रॉपसायन्स, ब्रिगेड एंटरप्रायझेस, कमिन्स इंडिया, फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज, गुजरात पिपावाव पोर्ट, गार्डन रीच आणि गार्डन शिप ICRA या कंपन्या 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT