Share Market Opening today eSakal
Share Market

Share Market Opening: दमदार सुरुवातीनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ

Share Market Today: अर बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच बाजारात उलथापालथ होत लाल रंगात व्यवहार सुरू केले. त्यामुळे बाजाराला सुरुवातीला मिळालेली आघाडी राखता आली नाही.

आशुतोष मसगौंडे

देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी नव्या उच्चांकावर उघडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 275.96 अंकांच्या वाढीसह 79752.15 च्या पातळीवर उघडला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 91.2 अंकांच्या उसळीसह 24,233.15 च्या पातळीवर उघडला.

निफ्टी बँक देखील 183.35 अंकांच्या वाढीसह 52758.10 च्या पातळीवर उघडला. आयशर मोटर्स, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि हीरो मोटोकॉर्प हे निफ्टीमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात प्रमुख वधारले, तर बजाज ऑटो, सन फार्मा, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स आणि अदानी एंटरप्रायझेस हे घसरले.

मात्र, शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच बाजारात उलथापालथ होत लाल रंगात व्यवहार सुरू केले. त्यामुळे बाजाराला सुरुवातीला मिळालेली आघाडी राखता आली नाही.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, BSE सेन्सेक्स सध्या 234.73 अंक किंवा 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 79,710.92 वर आहे आणि निफ्टी 50 66.35 अंक किंवा 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 24,208.30 वर आहे. काल सेन्सेक्स 79,476.19 वर आणि निफ्टी 24,141.95 वर बंद झाला होता.

सेन्सेक्सचे 17 शेअर्स ग्रीन झोनमध्ये

सेन्सेक्सवर 30 शेअर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी 17 ग्रीन झोनमध्ये आहेत. एचसीएल, टीसीएस आणि एअरटेलमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

दुसरीकडे, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि टायटनमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

172 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर

आज BSE वर 2639 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1989 शेअर्स मजबूत दिसत आहेत, 549 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 101 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही.

याशिवाय 172 समभागांनी एक वर्षाच्या उच्चांकावर तर 4 समभागांनी एका वर्षाच्या नीचांकी पातळी गाठली. 124 शेअर्स अप्पर सर्किटवर आहेत, तर 34 शेअर्स लोअर सर्किटवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latur Farmer News : लातूरमध्ये संतापजनक प्रकार! बैलजोडी खरेदी करून गावाकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात अडवलं अन्...

Vidarbha Heatwave Update : विदर्भात उष्णतेचा कहर! पारा थेट ४६.६ अंशांवर; 'या' दोन जिल्ह्यांत विक्रमी तापमान, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी...

Shiv Sena Leader Attack : परळीत हॉटेलमध्ये घुसून शिवसेना नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार; सोडवायला आलेल्या पत्नीलाही मारहाण, हाताची तुटली बोटं

Virat Kohli Scripts History! विराट कोहलीचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! IPL मध्ये असे पराक्रम करणारा जगातील पहिलाच फलंदाज...

Vikas Lawande Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जामीन; वारकरी संप्रदायाबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, न्यायालयात नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT