Share Market  Sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

Share Market Today: आज बुधवारी (3 जुलै) देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 80,000 चा टप्पा ओलांडला आहे आणि निफ्टीनेही पहिल्यांदा 24,250 चा टप्पा ओलांडला.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 3 July 2024: आज बुधवारी (3 जुलै) देशांतर्गत शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 80,000 चा टप्पा ओलांडला आहे आणि निफ्टीनेही पहिल्यांदा 24,250 चा टप्पा ओलांडला.

सकाळपासून जागतिक बाजार चांगले संकेत दिसत होते. आज सकाळी गिफ्ट निफ्टीमध्ये 125 अंकांची वाढ दिसून आली. काल अमेरिकन बाजारात Nasdaq, S&P विक्रमी पातळीवर बंद झाला आणि Dow 162 अंकांनी वाढला.

Share Market Opening

बँकिंग शेअर्स तेजीत तर आयटी शेअर्सवर दबाव

सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये सुमारे 3 टक्क्यांची सर्वाधिक वाढ झाली. कोटक महिंद्रा बँक देखील 1 टक्क्यांहून अधिक तेजीत आहे.

बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एसबीआय यांसारखे शेअर्स तेजीत आहेत. दुसरीकडे, सन फार्मा सर्वात जास्त 0.60 टक्क्यांनी घसरला. टीसीएस, टेक महिंद्रा, इन्फोसिस सारखे आयटी शेअर्सही सुरुवातीच्या व्यवहारात घसरले.

Share Market Opening

जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत

देशांतर्गत शेअर बाजाराला जागतिक बाजारातून पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी वॉल स्ट्रीटवरील सर्व निर्देशांक ग्रीन झोनमध्ये होते. Dow Jones इंडस्ट्रियल ॲव्हरेज 0.41 टक्के, S&P 500 0.62 टक्के आणि Nasdaq 0.84 टक्क्यांनी वर होते.

आज आशियाई बाजारही तेजीत आहेत. सुरुवातीच्या व्यापारात जपानचा निक्केई 0.84 टक्क्यांनी वर होता, तर टॉपिक्स 0.08 टक्क्यांनी तेजीत होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.26 टक्के आणि कोस्डॅक 0.5 टक्क्यांनी वधारले.

Sensex Crosses 80,000

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.75 लाख कोटींची वाढ

2 जुलै 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 4,42,18,879.01 कोटी रुपये होते. आज म्हणजेच 3 जुलै 2024 रोजी बाजार उघडताच ते 4,43,94,670.80 कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1,75,791.79 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BSE SENSEX

सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 20 शेअर्स तेजीत आहेत. एचडीएफसी बँक, कोटक बँक आणि जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये सर्वाधिक तेजी आहे. दुसरीकडे, सन फार्मा, एनटीपीसी आणि टीसीएसमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

आज BSE वर 2875 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 2205 शेअर्स तेजीत दिसत आहेत, 580 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 90 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून येत नाही. याशिवाय 158 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 6 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. 134 शेअर्स अप्पर सर्किटवर पोहोचले, तर 32 शेअर्स लोअर सर्किटवर पोहोचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT