Share Market Today Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात गुंतवणूदारांची निराशा; सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: शेअर बाजारात आज दिवसभर मंदीचे वातावरण असून बाजार सपाटून बंद झाले. परंतु बँक निफ्टी लाल चिन्हात बंद झाला. दिवसभर बाजारात जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 8 July 2024: शेअर बाजारात आज दिवसभर मंदीचे वातावरण असून बाजार सपाटून बंद झाले. परंतु बँक निफ्टी लाल चिन्हात बंद झाला. दिवसभर बाजारात जोरदार चढ-उतार पाहायला मिळाले. निफ्टी 3 अंकांनी घसरून 24,320 वर बंद झाला. सेन्सेक्स 36 अंकांनी घसरला आणि 79,960 वर बंद झाला. त्याच वेळी निफ्टी बँक 234 अंकांनी घसरून 52,425 वर बंद झाला.

Share Market Closing

संपूर्ण ट्रेडिंग सत्रात बाजाराने एका श्रेणीत व्यापार केला आणि कोणत्याही एका दिशेने कल आढळला नाही. मात्र, वेळोवेळी सेन्सेक्समध्ये काही प्रमाणात अस्थिरता होती. तज्ज्ञांचे मत आहे की बाजार एका श्रेणीत मजबूत होऊ शकतो आणि एका बाजूला कल वाढू शकतो.

Share Market Closing

बीएसईवर 4169 शेअर्सचे व्यवहार झाले ज्यामध्ये 1802 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 2257 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 110 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजच्या व्यवहारात FMCG शेअर्स ITC 2.27 टक्क्यांच्या वाढीसह, HUL 1.55 टक्क्यांच्या वाढीसह, नेस्ले 1.28 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

BSE SENSEX

याशिवाय एचसीएल टेक 0.92 टक्के, टाटा मोटर्स 0.87 टक्के, इन्फोसिस 0.72 टक्के, रिलायन्स 0.69 टक्के, टेक महिंद्रा 0.40 टक्के, भारती एअरटेल 0.34 टक्के वाढीसह बंद झाले. घसरलेल्या शेअर्समध्ये टायटन 3.54 टक्के, अदानी पोर्ट्स 1.65 टक्के, टाटा स्टील 1.30 टक्के, एशियन पेंट्स 1.31 टक्क्यांनी घसरले.

मार्केट कॅप प्रथमच 450 लाख कोटी रुपयांवर

भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप प्रथमच 450 लाख कोटी रुपयांच्या वर बंद झाले आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात, बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 450.14 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 349.88 लाख कोटी रुपयांवर होते. बाजारात प्रॉफिट बुकींग होऊनही आजच्या सत्रात भारतीय शेअर बाजाराचे मार्केट कॅप 26 हजार कोटींच्या वाढीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT