Stock market crash Iran-Israel war  Sakal
Share Market

Stock Market: इस्राईल इराण युद्धाचा भारतातील 14 कंपन्यांना बसणार फटका; गुंतवणूकदारांचे होणार मोठे नुकसान

Stock Market: मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. इराणने इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

राहुल शेळके

Stock Market: मध्यपूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. इराणने इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

यासोबतच जागतिक पुरवठा साखळीवरील युद्धाच्या परिणामाबद्दल गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. भारतीय शेअर बाजारात काल घसरण झाली. निफ्टीमध्येही हीच स्थिती दिसून आली. या महायुद्धाचा सर्वाधिक परिणाम भारतातील 14 मोठ्या कंपन्यांवर झाला आहे, ज्यात अदानी समूहापासून टाटा समूहापर्यंतच्या कंपन्यांचा समावेश आहे.

कोणत्या 14 कंपन्यांचा समावेश?

इस्रायलमध्ये उपस्थिती असलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये 14 पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्यांचा समावेश आहे, ज्यापैकी अनेकांवर संकटाचा मर्यादित परिणाम होऊ शकतो. यातील काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

इस्रायलच्या हैफा बंदराची मालकी असलेल्या अदानी पोर्ट्सचे शेअर्स 2.5% घसरले आणि BSE वर 1,429.35 रुपयांवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, इस्रायलच्या तारो फार्मास्युटिकल्समध्ये बहुसंख्य हिस्सेदारी असलेल्या सन फार्मास्युटिकल्सचे शेअर्स स्थिर राहिले.

याशिवाय, गुंतवणूकदार डॉ. रेड्डीज आणि ल्युपिन या प्रमुख जेनेरिक औषध कंपन्यांवरही लक्ष ठेवून होते. इतर कंपन्यांमध्ये खाण क्षेत्रातील NMDC आणि ज्वेलरी फर्म कल्याण ज्वेलर्स आणि टायटन यांचाही इस्रायलशी संबंध आहे.

टाटा समूहाच्या कंपन्यांचाही समावेश आहे

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), विप्रो, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस यांसारख्या इस्रायलमध्ये असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सवरही लक्ष केंद्रित केले होते. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), लार्सन अँड टुब्रो (L&T) या कंपन्यांच्या शेअर्सवरही परिणाम होऊ शकतो.

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठा साखळ्यांमध्ये व्यत्यय येण्याबद्दल चिंता वाढली आहे, ज्यामुळे जागतिक वित्तीय बाजारांमध्ये अस्थिरता वाढली आहे.

इस्रायलने इराणच्या तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रेंट क्रूड फ्युचर्सच्या किमती गुरुवारी 1% पेक्षा जास्त वाढून 75 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.

या परिस्थितीवर गुंतवणूकदारांनी बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाचा वापर करणाऱ्या पेंट आणि टायर कंपन्यांच्या शेअर्सवरही या युद्धाचा परिणाम दिसून आला. एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्सचे शेअर्स 3-4% घसरले.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT