Share Market Opening Sakal
Share Market

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; बँक निफ्टी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहे. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) शेअर बाजाराची संथ सुरुवात झाली. सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी घसरला आणि 81,556 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 10 अंकांनी घसरून 24980 च्या आसपास होता.

राहुल शेळके

Share Market Opening Latest Update 11 October 2024: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार सुरूच आहे. शुक्रवारी (11 ऑक्टोबर) शेअर बाजाराची संथ सुरुवात झाली. सेन्सेक्स सुमारे 60 अंकांनी घसरला आणि 81,556 च्या पातळीवर व्यवहार करत होता, तर निफ्टी सुमारे 10 अंकांनी घसरून 24980 च्या आसपास होता.

त्याचवेळी बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या पातळीवर फिरत होता. यानंतर बाजारातील घसरणही किंचित वाढल्याचे दिसून आले.

Share Market Opening
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

क्षेत्रीय निर्देशांकामध्ये निफ्टी बँक 0.41 टक्के, निफ्टी ऑटो 0.17 टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.54 टक्के, निफ्टी एफएमसीजी 0.05 टक्के, निफ्टी मीडिया 0.21 टक्के, निफ्टी पीएसयू बँक 0.15 टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक 0.3 टक्के, निफ्टी रियल्टीमध्ये 0.61 टक्के आणि निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये 0.03 टक्क्यांची घसरण झाली.

याशिवाय निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये 0.23 टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.14 टक्के, निफ्टी मेटलमध्ये 0.29 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 0.25 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 0.41 टक्के वाढ दिसून आली.

Share Market Opening
कोणते शेअर्स तेजीत?

सुरुवातीच्या व्यापारात, निफ्टी शेअर्समध्ये कोटक बँक 3.84 टक्क्यांनी, जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये 1.85 टक्क्यांनी, एचडीएफसी बँकमध्ये 1.71 टक्क्यांनी, बीईएलमध्ये 1.59 टक्क्यांनी आणि इंडसइंड बँकेत 1.51 टक्क्यांनी वाढ झाली. त्याच वेळी सिप्ला 3.37 टक्के, टेक महिंद्रा 2.82 टक्के, ट्रेंट 2.26 टक्के, सन फार्मा 1.86 टक्के आणि इन्फोसिसमध्ये 1.80 टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली.

BSE SENSEX
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

अमेरिकेतील वादळामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त महागाई आणि बेरोजगारीतील वाढीमुळे यूएस बाजार घसरणीसह बंद झाले. डाऊने तळापासून 150 अंकांची रिकव्हरी केली आणि 55 अंकांनी घसरला, तर नॅस्डॅकने 125 अंकांची रिकव्हरी केली आणि फक्त 10 अंकांनी घसरला.

अमेरिकेतील किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये साडेतीन वर्षांतील सर्वात कमी असला तरी अपेक्षेपेक्षा जास्त होता.

इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढण्याची भीती आणि अमेरिकेतील वादळ यामुळे कच्च्या तेलात जोरदार वाढ झाली. ब्रेंट 79 डॉलरच्या वर 3.5 टक्क्यांनी वाढला. दुसरीकडे, सोने 25 डॉलरने वाढून 2650 डॉलरवर पोहोचले, तर चांदी 2 टक्क्यांनी वाढून 31 डॉलरवर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

Chh. Sambhajinagar School: महापालिकेच्या २५ शाळांचे प्रवेश फुल्ल;यंदा वाढले ९१८ विद्यार्थी, प्रशासनाने केल्या सर्व शाळा स्मार्ट

SCROLL FOR NEXT