Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर बाजारात प्रॉफिट बुकींग; फार्मा शेअर्समध्ये घसरण

Share Market Closing: देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांकांनी सोमवारी (27 मे) नवीन विक्रमी उच्चांक गाठला, परंतु त्यानंतर आज पुन्हा बाजारात प्रॉफिट बुकींग झाली आणि बाजार सपाट बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 24 May 2024: देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांकांनी सोमवारी (27 मे) नवीन विक्रमी उच्चांक गाठला, परंतु त्यानंतर आज पुन्हा बाजारात प्रॉफिट बुकींग झाली आणि बाजार सपाट बंद झाले. व्यवहारादरम्यान निफ्टीने 23,110 च्या विक्रमी पातळीला तर सेन्सेक्सने 76,009 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला.

पण नवे रेकॉर्ड बनवल्यानंतर बाजारात प्रॉफिट बुकींग झाली आणि निफ्टी 24 अंकांनी घसरून 22,932 वर बंद झाला. सेन्सेक्स 19 अंकांनी घसरून 75,390 वर बंद झाला तर निफ्टी बँक 310 अंकांनी वाढून 49,281 वर बंद झाला.

Share Market Today

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत

शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या वाढीदरम्यान तुम्हाला नफा बुक करणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या शेवटच्या तासात सेन्सेक्स-निफ्टीने सर्व तेजी गमावली. तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्सचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये इरकॉन इंटरनॅशनल, इंजिनिअर्स इंडिया, एचडीएफसी बँक, लार्सन, एचसीएल टेक, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्सचे शेअर्स वाढले तर टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ओएनजीसी आणि विप्रोचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

शेअर बाजारातील वाढीदरम्यान डिव्हिस लॅब, इंडसइंड बँक, एलटीआय माइंडट्री, अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

तर अदानी एंटरप्रायझेस, ओएनजीसी, ग्रासिम, एसबीआय लाईफ, आयशर मोटर्स आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजाराच्या व्यवहाराच्या शेवटी, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह बंद झाले.

S&P BSE SENSEX

शेअर बाजाराचे मार्केट कॅप

आज बाजार बंद झाला तेव्हा BSE चे मार्केट कॅप 420.00 लाख कोटी रुपये होते. दिवसाच्या वाढीदरम्यान, ते 421.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. बाजाराच्या शेवटी 1.68 लाख कोटी रुपये एका तासात साफ झाले जेव्हा सेन्सेक्स शेवटच्या मिनिटांत घसरला.

कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 27 मे रोजी 419.94 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 24 मे रोजी 419.99 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 5,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 5,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

बीएसईवर झालेल्या 4105 शेअर्सपैकी 1711 शेअर्स वाढीसह बंद झाले आणि 2254 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 140 शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय बंद झाले. आज बंद होत असताना 335 शेअर्स अप्पर सर्किटमध्ये तर 314 शेअर्स लोअर सर्किटमध्ये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT