Tata Motors Sakal
Share Market

Tata Motors: तिमाही निकालानंतर टाटा मोटर्सचे गुंतवणूकदार उत्साहात, शेअर्समध्ये 84% तेजीचा तज्ज्ञांना विश्वास

Tata Motors: गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये 43 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Tata Motors: टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) शेअर्समध्ये सध्या चांगली वाढ दिसत आहे. गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 43 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीने नुकतेच आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले.

एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 3203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळेच ब्रोकरेज कंपन्या या शेअरबाबत पॉझिटीव्ह आहेत. टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या 413.45 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 21,024.05 कोटी झाले आहे.

उत्कृष्ट तिमाही निकालांमध्‍ये, ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर या शेअर्सबाबत अतिशय पॉझिटीव्ह दिसत आहेत. ब्रोकरेजने 26 जुलै 2023 रोजीच्या रिसर्च रिपोर्टमध्ये या शेअरला 760 रुपयांच्या टारगेटसह बाय रेटिंग दिले आहे.

याचा अर्थ ब्रोकरेजला सध्या स्टॉकमध्ये तब्बल 84 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. ब्रोकरेजने यापूर्वी 675 रुपयांचे टारगेट निश्चित केले होते.

जून तिमाहीत टाटा मोटर्सचा निव्वळ नफा 3203 कोटी होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 5006 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

कंपनीच्या नफ्याचे मुख्य कारण म्हणजे पॅसेंजर वाहन व्यवसायाच्या मार्जिनमध्ये झालेली वाढ आणि त्याच्या लक्झरी कार युनिट जग्वार लँड रोव्हर म्हणजेच जेएलआरची जोरदार विक्री. या कालावधीत त्यांचा महसूल वार्षिक 42 टक्क्यांनी वाढून 1.02 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT