Tech Mahindra Share sakal
Share Market

Tech Mahindra Share : टेक महिंद्रा देणार 560% डिव्हिडेंड ; रेकॉर्ड डेट जाणून घ्या...

टेक महिंद्राने (Tech Mahindra) आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले. याशिवाय, कंपनीने गुंतवणूकदारांसाठी 560 टक्के फायनल डिव्हिडेंडचीही घोषणा केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

टेक महिंद्राने (Tech Mahindra) आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर केले. याशिवाय, कंपनीने गुंतवणूकदारांसाठी 560 टक्के फायनल डिव्हिडेंडचीही घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटेड नफा अपेक्षेपेक्षा कमी होता. त्याचवेळी मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत उत्पन्नाच्या आघाडीवर कंपनीला निराशेचा सामना करावा लागला आहे. कंपनीची कमाई मागील तिमाहीपेक्षाही कमी होती.

टेक महिंद्राने प्रति शेअर 5 रुपये फेस व्हॅल्यूवर 28 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंडची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून मंजुरी घेतली जाईल. त्यांच्या मंजुरीनंतर, 09 ऑगस्ट 2024 पासून डिव्हिडेंड दिला जाईल. टेक महिंद्राने 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 800 टक्के डिव्हिडेंड दिला आहे. याशिवाय कंपनीने तरुण बजाज, नीलम धवन आणि अमरज्योती बरुवा यांची अतिरिक्त संचालक (नॉन-एक्झिक्युटिव्ह) म्हणून नियुक्ती केली आहे. शिखा शर्मा, हग्रीव खेतान आणि मुक्ती खरे यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

टेक महिंद्राच्या नियामक फायलिंगनुसार, मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटेड नफा 510 कोटीवरून 661 कोटी रुपये (QoQ) वाढला आहे. या तिमाहीत कंपनीला 690 कोटीचा नफा अपेक्षित होता. तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न 1301 कोटीवरून 12871 कोटीपर्यंत घसरले आहे. ॲट्रिशन रेट वार्षिक आधारावर 15 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. जानेवारी-मार्चमध्ये सीसी महसुलात 0.8 टक्के (QoQ) घट झाली आहे.

आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत टेक महिन्द्राचा ट्रेडिंग नफा 703 कोटींवरून 639 कोटीवर (QoQ) घसरला आहे. मार्जिन चौथ्या तिमाहीत 5.4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर घसरले आहे. टेक महिंद्रा 0.34 टक्क्यांनी वाढून 1190.10 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,416 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 982.95 रुपये आहे. टेक महिंद्राच्या शेअर्सने एका वर्षात गुंतवणूकदारांना 19.52 टक्के परतावा दिला आहे. टेक महिंद्राचे मार्केट कॅप 1.16 लाख कोटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT