Tyre Stocks Sakal
Share Market

Tyre Stocks: 'ही' टायर कंपनी देणार डिव्हिडेंड, रेकॉर्ड डेटही निश्चित, शेअर्सची वाढली खरेदी

या महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

शिल्पा गुजर

Tyre Stocks: दिग्गज टायर कंपनी बाळकृष्ण इंडस्ट्रीज (Balkrishna Industries) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी पहिला अंतरिम डिव्हिडेंड जाहीर करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी येत्या 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

कंपनीने 28 जुलैला एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. कंपनीने डिव्हिडेंडसाठी रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे. सध्या याचे शेअर्स बीएसईवर 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 2,480.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. या महिन्यात शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

बालकृष्ण इंडस्ट्रीजने 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या अंतरिम डिव्हिडेंडचा निर्णय घेतला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट 2023 रोजी या डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे, शिवाय कंपनी त्याच दिवशी जून तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

बालकृष्ण इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2022 रोजी या शेअर्सची किंमत 1801 रुपये होती. हा एक वर्षाचा नीचांक आहे.

यानंतर खरेदी वाढली आणि सात महिन्यांत 21 जून 2023 रोजी ती 40 टक्क्यांहून वाढत 2525 रुपयांवर पोहोचली. ही त्याची एक वर्षातील उच्चांकी पातळी आहे.

यानंतर शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि एका महिन्यात ते दीड टक्क्यांहून अधिक घसरले. यावर्षी त्यात 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT