Warren Buffett's Berkshire Sakal
Share Market

Warren Buffett: शेअर बाजारात मंदी येणार? वॉरेन बफे यांनी बाजारातून काढले 277 अब्ज डॉलर्स, काय आहे कारण?

Warren Buffett's Berkshire: गेल्या काही महिन्यांपासून जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम जमा करत आहेत. त्यांची कंपनी बर्कशायरने सध्या सुमारे 276.9 अब्ज डॉलर रोख स्वरुपात जमा केली आहे.

राहुल शेळके

Warren Buffett's Berkshire: गेल्या काही महिन्यांपासून जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम जमा करत आहेत. त्यांची कंपनी बर्कशायरने सध्या सुमारे 276.9 अब्ज डॉलर रोख स्वरुपात जमा केली आहे. गुंतवणुकीनंतर उरलेल्या पैशातून लोकांना नेहमी खर्च करण्याचा सल्ला देणाऱ्या वॉरन बफे यांची ही भूमिका अवघ्या जगाला आश्चर्यचकित करणारी आहे.

कंपनीकडे असलेली रोकड आता तिच्या एकूण मालमत्तेच्या सुमारे 25 टक्के आहे. जून 2025 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा कंपनीने आपली 25 टक्के मालमत्ता रोखीत ठेवली आहे. बर्कशायर हॅथवेने अलीकडेच अॅपल आणि बँक ऑफ अमेरिका (बोफा) मधील शेअर्स विकले.

यानंतर, कंपनीकडे असलेली एकूण रोकड आणि रोख समतुल्य 276.9 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले. यावरून असे सूचित होते की इक्विटी मार्केटचे उच्च मूल्यांकन लक्षात घेता वॉरेन बफे सध्या गुंतवणूक करणे टाळत आहेत.

बर्कशायरने 3 ऑगस्ट रोजी सांगितले की त्यांनी Apple Inc. मधील आपली हिस्सेदारी सुमारे 50% कमी केली आहे आणि जुलै महिन्यात बँक ऑफ अमेरिका मधील आपला हिस्सा 8.8% ने कमी केला आहे.

दरम्यान, बर्कशायर हॅथवेच्या रोख होल्डिंगवर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. इक्विटी मार्केट ट्रॅकिंग फर्म कोबे लीटरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर विचारले की बफेट मंदीची अपेक्षा करत आहेत का?

बर्कशायरच्या रोख राखीव रकमेत गेल्या दोन वर्षांत जवळपास दुप्पट वाढ झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. रोख होल्डिंगमध्ये ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा अमेरिकेत मंदीची शक्यता आहे. तेथील जॉब मार्केटही कमकुवत दिसत आहे.

बफेट सतत शेअर्स विकून पैसे काढण्यामागील हे एक कारण असू शकते की त्यांना भविष्यात कॉर्पोरेट कर वाढण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेतील मंदीची भीती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर वॉरन बफे यांची ही भूमिका आणखीनच अस्वस्थ करणारी आहे. याशिवाय कॉर्पोरेट टॅक्स हे शेअर विक्रीचे प्रमुख कारण मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही

Jalgaon Politics : सगळ्यांना मामा बनवणारे जिल्हाधिकारी!; गिरीश महाजन यांच्या कोपरखळीने सभागृहात हंशा

SCROLL FOR NEXT