Share Market Investment Sakal
Share Market

Multibagger Stock Tips: केवळ 2 वर्षात एका लाखाचे झाले 3 कोटी, 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock Tips: 2014 साली शेअर बाजारात लिस्ट झालेल्या या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती मागच्या 3 वर्षात वाढली आहे.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips : राज रेयॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industries) हा अशा पेनी स्टॉकपैकी एक आहे ज्याने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. 2014 साली शेअर बाजारात लिस्ट झालेल्या या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती मागच्या 3 वर्षात सुसाट वाढल्या आहेत.

हा स्मॉलकॅप स्टॉक गेल्या 2 वर्षात 33,000% पेक्षा जास्त वाढला आहे. त्याच वेळी गेल्या एका वर्षात त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 3700% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

सुमारे 2 वर्षांपूर्वी 26 मार्च 2021 रोजी राज रेयॉन इंडस्ट्रीचे शेअर्स बीएसईवर अवघ्या 0.20 रुपयांवर होते, जे आता 67.44 रुपयांवर पोहोचलेत. अशाप्रकारे, गेल्या 2 वर्षांत या स्टॉकची किंमत सुमारे 33,000% वाढली आहे.

गेल्या 6 महिन्यांत या मल्टीबॅगर शेअरची किंमत 16 रुपयांवरून 67.44 रुपयांपर्यंत वाढली, ज्यामुळे या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 300% परतावा मिळाला आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा शेअर 80.22 टक्क्यांनी वाढला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याच्या 1 लाख रुपयांची किंमत 3.7 कोटी झाली असती. दुसरीकडे एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये फक्त एक वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 38 लाख रुपये झाले असते.

राज रेयॉनचे मुख्यालय मुंबईत आहे. हे देशातील पॉलिस्टर धाग्याचे प्रमुख उत्पादक आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये ब्राइट यार्न, कॅशनिक यार्न, कोटलुक आणि कलर्ड यार्न यांचा समावेश आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur CCTV : आचारसंहिता सुरू असतानाच कोल्हापुरातील ६२ सीसीटीव्ही बंद; ‘सेफसिटी’च ठरली अनसेफ!

Crime: मुंबईमध्ये २ मुलांच्या आईनं प्रियकराला पार्टीसाठी बोलवलं; आधी गोड खाऊ घालत संबंध ठेवले, नंतर गुप्तांग कापलं, कारण...

Dombivli Election : डोंबिवलीत भाजपाची बिनविरोध ‘हॅट्ट्रिक’; भावापाठोपाठ बहीणही निवडून!

Ichalkaranji Election : इचलकरंजीत २२ उमेदवारी अर्ज माघारी; डमी उमेदवार बाहेर, बंडखोर अद्याप रिंगणात

Kolhapur Muncipal : कोल्हापुरात महायुती प्रचाराचा शंखनाद; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा

SCROLL FOR NEXT