Ram Mandir to be at the center stage during Lok Sabha 2019 
संपादकीय

प्रभू रामचंद्र : सौम्यशक्तीचे अक्षय्य भांडार

सकाळ वृत्तसेवा

आज अक्षय तृतीया. भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणली तो पवित्र दिवस. असे म्हणतात, की या दिवशी आपण जे सत्कार्य करू त्याचे अक्षय्य फळ आपणास मिळते.आजच्या या शुभ दिनी आवर्जून श्रीरामाच्या अक्षय्य गुणांचे चिंतन करूया.

अक्षय तृतीया म्हणजे भगीरथाने पृथ्वीवर गंगा आणली तो पवित्र दिवस! असे म्हणतात, की या दिवशी आपण जे सत्कार्य करू त्याचे अक्षय्य फळ आपणास मिळते! म्हणूनच आजच्या दिवशी अन्नदान-वस्त्रदान केले जाते, सोन्यासारख्या शुद्ध धातूची खरेदी केली जाते, विशेष कार्याचा आरंभ केला जातो! ही तिथी वर्षभरात सगळ्यात शुभ तिथी मानली जाते. या दिवशी शेतात नांगरणी करण्याची प्रथा काही भागात आहे. शेताच्या मशागती इतकीच मनाची मशागतही महत्त्वाची!

भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा आत्मा श्रीराम!
कवी कुमार विश्वास लिहितात,
मानवता की खुली आँख के
सब सें सुंदर सपने राम।।
जिव्हा वाणी अर्थवती हो गयी
लगी जब जपने राम।।

देश विदेशातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

प्रभू श्रीराम अत्यंत अनाग्रही होते. योगवासिष्ठात म्हटले आहे , ‘‘अनाग्रही असणे हे स्थिर मतीचे पहिले लक्षण आहे.’’ आपल्या गुरुचा हा उपदेश श्रीरामाने आपल्या आयुष्यात केंद्रस्थानी ठेवला. मला जे वाटते आहे तेच केवळ योग्य आणि तसेच घडले पाहिजे, असा विचार रामाने कधीही समोर ठेवला नाही. सौम्यपणे समजावून सांगून पाहिले, मात्र कोठेही आत्यंतिक आग्रह धरला नाही. सीतेने रामासोबत वनामध्ये जाण्याचे ठरवले, तेव्हाही रामाने सौम्यपणे सीतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या प्रबळ इच्छेपुढे त्याने आपले मत बाजूला ठेवले.
भरताला राज्यावर बसायचे नव्हते, तर रामाच्या खडावा घेऊन त्या सिंहासनावर ठेवून राज्य करायचे होते. त्यालादेखील रामाने शांतपणे मान्यता दिली. प्रत्येक जीवाची स्वतंत्र इच्छा आणि त्याच्या प्रारब्धाची गती यामध्ये आपण येऊ नये हा संदेश श्रीराम देतात.
राण आणि रावण यांच्या राज्यांमध्ये किती फरक होता! एक राज्य होते सौम्य शक्तीचे, तर दुसरे राज्य होते सत्ताकेंद्रित शक्तीचे!! रामराज्यात मान्यता होती, की मनुष्य मूलतः चांगला आहे. त्यामुळे राज्यव्यवस्था निर्मिती त्याच्यातील गुणांना वाव मिळेल अशा रचनेची असावी. तर रावण समजत असे की, ‘व्यक्तीचा स्वभाव मूलतः दुष्ट आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्था ही या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी असावी. ती हुकूमशाही पद्धतीची असावी.’
रामाने कोणतेही चमत्कार केले नाहीत। त्याचे आयुष्य देखील समस्यांनी आणि दुःखाने भरलेले आहे, असे असताना हा नायक लोकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे. या महाकाव्याचे नायिका सीता तर सतत हालअपेष्टा सहन करत गेली. तिला संसारिक आणि भौतिक सौख्य कधीच लाभले नाही. अशी व्यक्तिमत्वे विकासाच्या मार्गावर आदर्श कशामुळे म्हटली गेली असतील?? आजही आपण कोणाला विचारले आदर्श पुत्र कोण ? आदर्श बंधु कोण? आदर्श मित्र कोण? आदर्श पती कोण ? आदर्श पत्नी कोण? तर उत्तरादाखल रामायणातील पात्रांचीच अधिकतर नावे येतील. काय असावे या मागचे कारण?

कर्तव्य आणि मनःशांती
विचार करा..एक राजकुमार ज्याचा उद्या राज्याभिषेक होणार आहे, तो डोळ्यासमोर आणा. त्याला अचानक कळतं की आपल्याला १४ वर्षे वनात जायचे आहे. वडिलांनी आपल्या वतीने आईला हे वचन दिले आहे. त्या प्रसंगाला त्याने दिलेला प्रतिसाद हा रामायणाचा केंद्रबिंदू. कोणत्याही परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो,त्यावर आपल्या जीवनाची दिशा अवलंबून असते. आंतरिक विकासाची ही परमावधी म्हणजेच विकासाची भारतीय संकल्पना. या राजकुमाराची पत्नी,जी स्वतः राजकन्या आहे,ती सीता; पण पतीसमवेत वनात जाते. भाऊ लक्ष्मणही वनात जाण्याचे ठरवतो! मात्र त्याची पत्नी उर्मिला सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी अयोध्येत रहाते. या राजकुमाराचा धाकटा भाऊ भरत, परत आल्यानंतर रामाच्या पादुकांना सिंहासनावर ठेवून विश्वस्त म्हणून राज्य चालवतो.
सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत या रामाच्या सोबतच्या अन्य व्यक्तिरेखा रामायणाला हृद्य बनवतात. हे निर्णय घेण्याचे किंवा या विपरित निर्णय घेण्याचे या सर्वांना स्वातंत्र्य होते।त्यांनी निवडलेल्या मार्गाला विकसित मनाचे निर्णय म्हणता येईल. संघर्ष की मनःशांती.. यात प्रत्येकाने मनःशांती निवडली आहे. तीही आत्मसन्मान न गमावता! कसोटीच्या प्रसंगात देखील,त्याला कसे तोंड द्यायचे हे आपल्याला ठरवता येते. मनुष्याचे मानसिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. रामायण आपल्याला हे शिकवते.

जीवनातील स्थायी मूल्यांना केंद्रीकृत करून महर्षी वाल्मिकींनी ही रामायण गाथा लिहिली. भारताच्या गृहस्थी जीवनाचे आदर्श या कथेमधून उभे केले. राजाच्या कर्तव्याची, निष्ठेची,प्रजापालन, सत्यपालनाची रामायण ही कसोटी ठरली. व्यक्तीचे आदर्श जीवन आणि सामाजिक जीवन याची कितीतरी उदाहरणे येथे ठायींठायी येतात. एकेक व्यक्तिरेखा आपल्याला जीवन जगतांना ते कशासाठी आणि कसे जगायचे हे शिकवून जाते. ज्याला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते तो श्रीराम या काव्याचा नायक आहे. अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये देखील मनुष्य आपल्या चारित्र्याचे, जीवन मूल्यांचे रक्षण कशा प्रकारे करू शकतो, याचे तो आदर्श उदाहरण आहे. रामाचे वर्णन करताना वाल्मिकींची लेखणी माधुर्याने ओथंबली आहे। ते लिहितात,"श्रीराम नेहमीच शांतचित्त असतात। ते संभाषण करताना वाणीत कोमलता आणि मृदुता ठेवतात। दुसरा कितीही रुक्ष बोलला तरी ते मधुरच बोलतात. ते बलशाली आहेत. पण त्यांच्या बलाचे, पुरुषार्थाचे भय वाटत नाही, तर त्याविषयी विश्वास वाटतो."

रामाचे चरित्र हे मानवतेच्या चरम अवस्थेचे वर्णन करणारे आहे. एक मनुष्य जो दैवी अवतार असला तरी,कोणत्याही चमत्काराशिवाय आयुष्य कसे घडवतो, हे रामायण सांगते.

- डॉ.रमा दत्तात्रय गर्गे
(लेखिका मानव्यविद्या संशोधन सहाय्यक व ‘कालिदास विद्यापीठ विस्तार मंडळ प.महाराष्ट्रा’च्या समन्वयक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Mira Bhayandar Morcha : 'परप्रांतीयांनी मोर्चा काढला, त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण मनसेचा..'; आमदार मेहतांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता!

Latest Maharashtra News Updates : "लाज असल्यास मंत्रीपदाचा राजीनामा द्या" - राजन विचारे

Pimple Gurav News : निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे ‘दृष्टीहीन’ देखभालीचा अभाव; सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील सुरक्षा ऐरणीवर

Yash Dayal: यश दयालच्या विरोधात FIR दाखल, होऊ शकते १० वर्षांची शिक्षा! तक्रार करणाऱ्या महिलेने पुरावेही केले सादर

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

SCROLL FOR NEXT