JNU
JNU 
संपादकीय

"जेएनयू'मध्ये "लाल सलाम'च!

सकाळवृत्तसेवा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघपरिवारातील संघटनेने गेल्याच आठवड्यात दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य जागांवर यश मिळवल्यानंतर लगेच होऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू)चाही गड काबीज करण्याच्या त्या संघटनेच्या आशा प्रज्वलित झाल्या होत्या. मात्र, विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या "जेएनयू'मधील निवडणुकांमध्ये पुनःश्‍च डाव्या विचारांच्या संघटनांनी बाजी मारली.

चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यापासून डाव्या, तसेच पुरोगामी विचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठावर ताबा मिळवण्यासाठी "अभाविप' प्रयत्न करत आहे. यंदाच्या निवडणुकीत डाव्यांच्या विरोधात "अभाविप' सर्व ताकदीनिशी मैदानात उतरली होती आणि त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींबरोबरच हाणामाऱ्या, तोडफोड यामुळे या निवडणुकांमध्ये रंग भरला होता. त्यामुळेच या वेळी "जेएनयू'च्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजे 67 टक्‍के मतदान झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण 10 टक्‍क्‍यांनी अधिक आहे, एवढी एकच बाब या निवडणुका किती चुरशीच्या झाल्या, ते दाखवून देते. या विद्यापीठात देशद्रोही कारवाया होत असल्याचा आरोप मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून सातत्याने केला जात आहे. त्यातूनच तेथील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याच्या विरोधात देशद्रोहापासून अनेक आरोप केले गेले. मात्र, त्यानंतरही तेथील विद्यार्थ्यांमध्ये डावे, तसेच पुरोगामी विचारांचे बीज कसे रूजले गेले आहे, यावर या निकालांनी शिक्‍कामोर्तब केले आहे. मतदान पार पडल्यानंतर, मतमोजणीत अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न "अभाविप'ने केला. त्यामुळे मतमोजणी काही काळ थांबवावी लागली होती.

अखेर रविवारी जाहीर झालेल्या निकालांत डावेच उजवे ठरल्याचे स्पष्ट झाले असले, तरी त्यामुळे या विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये गेली काही वर्षे सुरू असलेल्या संघर्षावर पडदा पडला, असे म्हणता येणार नाही. त्याचे प्रमुख कारण सध्या जमावाकडून निरपराध्यांना ठेचून ठार मारण्याचे होत असलेले प्रकार, तसेच कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराच्या विरोधात अध्यक्षपदाचे उमेदवार एन. साई बालाजी यांनी आवाज उठवला होता. आता निवडून आल्यावर बालाजी यांनी या विद्यापीठातील सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा हाती घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हे विद्यापीठ येत्या निवडणुकांतही डाव्यांचे केंद्र म्हणूनच काम करणार, असे स्पष्ट दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT