Chinese apps opportunity for Indians 
संपादकीय

चिनी ऍपवरील बंदी, भारतीयांना संधी 

अशोक झुनझुनवाला, तामस्वती घोष

चिनी "ऍप'वर घातलेली बंदी, ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार देशी "ऍप' विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्ट अपसाठी एक संधी ठरू शकते. मात्र त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. 

ही तर समृद्धीची संधी 
व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, जीमेल, पेटीएम, टिकटॉक अशा सर्वच प्रकारच्या मोबाइल ऍपच्या माध्यमातून, ही ऍप विकसित करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर महसुली उत्पन्न मिळते. आपापली कार्यक्षमता आणि वैशिष्ट्यांनुसार ही "ऍप"आपल्या फोन आणि टॅब्लेट्‌सना स्मार्ट बनवतात. आजघडीला भारतात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच ऍपची निर्मिती आणि व्यवस्थापन परदेशी कंपन्या करतात. यात प्रामुख्याने पाश्‍चात्त्य देशांचा समावेश आहे आणि अलिकडच्या काळात चीनने तयार केलेली अनेक ऍपही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. 

आजघडीला भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 80 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि त्या माध्यमातून आपण ही ऍप तयार करणाऱ्यांच्या महसुली उत्पन्नात वाढ करण्यात हातभार लावत आहोत. "टिकटॉक"ची बाजारपेठ भारतात वेगाने वाढत आहे. जगभरातल्या दोन अब्ज लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले असून त्यात भारतीयांचे प्रमाण तब्बल 30 टक्के आहे. "ऍप' निर्माण करणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या तोडीस तोड काम करून वापरकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात भारतीय कंपन्या आतापर्यंत अयशस्वी ठरल्या आहेत. 

चीनने कसे साध्य केले? 
सुमारे दहा वर्षांपूर्वी चीनमध्ये अशीच काहीशी परिस्थिती होती, जेव्हा अमेरिका आणि युरोपमध्ये विकसित झालेल्या ऍपनी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. एक वेळ अशी आली, की चीन सरकारने यापैकी अनेक "ऍप'वर बंदी घातली. उदाहरण घ्यायचे झाले तर आज चीनमध्ये व्हॉट्‌स ऍपवर बंदी आहे. अशा अनेक ऍपवर बंदी घातल्यानंतर चीनमधल्या देशी कंपन्यांनी कंबर कसली आणि दर्जेदार ऍप तयार केली. त्यामुळे अमेरिकी उत्पादनांच्या तोडीस तोड अशी अनेक उत्पादने चिनी वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाली. नंतरच्या काळात प्रतिस्पर्ध्याने बाजारपेठेतून काढता पाय घेतल्याचा सर्वात जास्त फायदा WeChat सारख्या चिनी ऍपना झाला. अशाच प्रकारे गुगल मॅपसह गुगलच्या सर्व ऍपवर चीनमध्ये बंदी घालण्यात आली, त्यानंतर तिथे "बाईडू' (लोकप्रिय सर्च इंजिन) तर्फे तशाच प्रकारची ऍप विकसित करण्यात आली. नंतरच्या काळात फेसबुक, ट्‌वीटर आणि इन्स्टाग्रामची जागा अलीपे (Alipay) आणि क्‍यूबेने (Qqube) घेतली. अलिबाबा ग्रुपसारख्या चिनी उपक्रमांनी अशा प्रकल्पांसाठी वित्तपुरवठा केला आणि आता या ऍप कंपन्या पाश्‍चिमात्य कंपन्यांइतक्‍याच सधन झाल्या आहेत. अलिकडच्या काळात यापैकी काही चिनी ऍपनी भारतातही चांगलाच शिरकाव केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतीयांची तांत्रिक क्षमता उत्तम 
चिनी "ऍप'वर घातलेली बंदी, ही भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करणारी दर्जेदार देशी ऍप विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्ट अप्ससाठी एक संधी ठरू शकते का? आगामी काळात आपण विकसित केलेल्या ऍपचा विस्तार जगभरात होऊ शकतो का? होय. ही खचितच एक उत्तम संधी आहे, मात्र ते सोपे नाही. अशा प्रकारची ऍप विकसित करण्याची तांत्रिक क्षमता निश्‍चितपणे भारतीय युवकांकडे आहे. आपल्याकडील अनेक जण फेसबुक आणि गुगलसारख्या, या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या उत्पादनांवर काम करतात. अशा प्रकारच्या कामासाठी आवश्‍यक कौशल्यांचा आपल्या देशात सातत्याने विस्तार होतो आहे. नुकताच आयआयटी मद्रासने "बी. एस्सी. - डेटा सायन्स ऑनलाईन" अभ्यासक्रमाचा शुभारंभ केला. कोणत्याही शाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. या माध्यमातून दर्जेदार ऍप्लिकेशन्स विकसित करणारे युवक देशाला लाभतील, अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या क्षमता अधिक विकसित होतील. 

भांडवलाची आवश्‍यकता 
मात्र मोबाइल ऍप यशस्वी होण्यासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. वापरकर्त्यांना आकर्षित करणारी ऍप त्यांच्या वेधक स्वरूपामुळे, वापर करण्यातील सुलभतेमुळे आणि नावीन्यपूर्ण सुविधांमुळे लोकप्रिय होत असतात. ती सतत अद्ययावत होत राहतात. प्रत्येक प्रदेशातील वापरकर्त्यांच्या सवयी ओळखून, ऍप्सची रचना आणि फेररचना करत, त्यात नव्या सुविधांचा समावेश करत ही ऍप आपल्या वापरकर्त्यांना जास्तीत जास्त वापर करण्यास भाग पाडत राहतात. अशा प्रकारची ऍप विकसित करण्यासाठी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या चमूची आणि त्यांना उत्तम वित्तपुरवठा करण्याची आवश्‍यकता असते. बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने पुरेशा भांडवलाचीही आवश्‍यकता असते. आजघडीला स्टार्ट अप्ससमोर ही सगळी आव्हाने आहेत. 

मात्र तरीही भारतातील स्टार्ट अप्स समुदाय, हे आव्हान पेलण्यास उत्सुक आहेत, सक्षमही आहेत. संधी उपलब्ध होतीच, आता सरकारने चिनी ऍपवर बंदी घातल्यामुळे या संधीचा पुरेपूर लाभ घेणे शक्‍य होणार आहे. तो घेण्यासाठी "स्टार्ट अप्स'नी पुढाकार घेतला पाहिजे, यशस्वी झाले पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, अपयशातून शिकावे लागेल आणि सर्व प्रकारच्या प्रतिकूलतांवर मात करावी लागेल. खरे तर स्टार्ट अपचा अर्थ हाच आहे. सुदैवाने आजघडीला भारतात स्टार्ट अप्ससाठी व्यापक यंत्रणा उपलब्ध आहे, यशस्वी होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला खात्री वाटते की एक दिवस निश्‍चितच असा येईल, जेव्हा आपल्या मोबाइलवर भारतीय "ऍप" आवडीने वापरली जातील. 
(लेखकद्वय आयआयटी, मद्रास येथे कार्यरत आहेत.) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT