sampadkiya sakal
संपादकीय

ढिंग टांग ब्रिटिश नंदी : बाजीगर मैं बाजीगर..!

बेटा : (प्रचंड प्रचंड उत्साहात नाट्यपूर्ण) ढॅणट ढॅऽऽण…टणाटणाटणा टणा…डाडाडा…डाडाडा…लाला…लाऽऽ…!!

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

बेटा : (प्रचंड प्रचंड उत्साहात नाट्यपूर्ण) ढॅणट ढॅऽऽण…टणाटणाटणा टणा…डाडाडा…डाडाडा…लाला…लाऽऽ…!!

मम्मा मॅडम : (विजयी उमेदवारांची यादी प्रेमभराने कुर्वाळत) ओहोहो! काय अगदी आनंद झालाय एका माणसाला! अगदी गगनात मावत नाही, म्हणतात ना, तस्सा!!

बेटा : (फिल्मी अंदाजात गिटार वाजल्याची ॲक्शन करत) बाजीगर मैं बाजीगऽऽर…मैं हूं बडा जादूगर…दिल लेके दिल दिया है, सौदा प्यार का किया है, दिल की बाजी जिता दिल हारकर…डुडुडुंग… डुडुडुंग… डुडुडुंग…ट्रींग..!!

मम्मा मॅडम : (हरखून) अभिनंदन हं! आज साच्चाई की जीत हुई हैं, तानाशाह हार गया हैं! मुझे तुमपर नाज है, बेटा!! तुम मेरे आंख का तारा हो!!

बेटा : (एसआरके स्टायलीत) देख लोक इधर तो इकबार…मैं हूं ना!!

मम्मा मॅडम : (समाधानाने) अर्धी लढाई आपण जिंकलीच!! शाब्बास! तुला काय देऊ? पिझ्जा, पास्ता की बर्गर?

बेटा : (गंभीरपणाने) मला काहीही नको! माझं पोट भरलंय! आणि लेट मी करेक्ट यू…आपण अर्धीच नाही, तर पूर्ण लढाई जिंकली आहे आपण!!

मम्मा मॅडम : (जावळ कुरवाळत) बेटा, आता फक्त शंभरेकच जागा मिळाल्या आहेत, म्हणून म्हटलं! पुढल्या वेळेला आपण नक्की चारसौ पार करू!!

बेटा : (अभिमानाने) मेरी सौ सीटे चारसौ के बराबर की होगी! कारण माझ्या शंभर जागा कष्टाच्या आहेत! त्यासाठी मी देशभर दोनदा पायपीट केली आहे! कुणी केली आहे सांग एवढी पायपीट?

मम्मा मॅडम : (खुशीत) यू आर द मॅन! किती वणवण केलीस! किती कष्ट घेतलेस! हे यश फक्त आणि फक्त तुझंच आहे!!

बेटा : (स्तुतीने खुशालत) आपल्या पक्ष कार्यालयात किती तरी वर्षांनी लाडू वाटण्यात आले! मला तर दोन मिळाले!!

मम्मा मॅडम : (आनंदातिरेकाने) त्या कमळवाल्यांची खोड मोडलीस हे बरं झालं! मेले फार माजले होते! दहा वर्षं किती त्रास झाला, माझं मला माहीत! दहा वर्षं दिवसरात्र मला चिंता लागली होती! हे दिवस कसे बदलतील, याचाच विचार करत होते!

बेटा : (सहजतेनं) हॅ…मला पहिल्यापासूनच कॉन्फिडन्स होता! मोदीजींना मी सहज हरवू शकतो! ॲक्चुअली, माझं जरा चुकलंच!

मम्मा मॅडम : (नकारार्थी मान हलवत) काहीही चुकलं नाही! या वेळी तुझी सगळी उत्तरं बरोबर आली!!

बेटा : (दुर्लक्ष करत) मी बनारसमधून उभं राहायला हवं होतं! उगीच तुमचं ऐकून त्या रायबरेलीत आणि वायनाडमध्ये गेलो!! दोन्हीकडे जिंकलो, ते सोड! पण बनारसमध्ये मोदीजींना पाच-सात लाख मतांनी हरवलं असतं!! ये मेरी गॅरंटी है!!

मम्मा मॅडम : (अंगावर शहारा आल्यागत) एक दु:स्वप्न संपलं!!

बेटा : (बिनधास्तपणे) अब क्या करने का है? तुम सिर्फ बताव!!

मम्मा मॅडम : (डोळे मिटून) सध्या तरी मला हाच क्षण जगायचा आहे! हे खरंच घडतंय? आपण त्या कमळवाल्यांना खरंच धूळ चारली? मला एक चिमटा काढ बरं!!

बेटा : (एक दीर्घ सुस्कारा टाकत) हे अगदी खरं आहे, हंड्रेड पर्सेंट!! हा माझा ‘हात’ बघ!

मम्मा मॅडम : (अभिमानाने) हा हात माझाही आहे! हाथ बदलेगा हालात, हे अगदी खरं ठरलं! हो ना?

बेटा : (तोच हात कपाळावर मारत) आपण निवडणुकीचं मैदान मारलं, तेव्हा मी शंभर वेळा तरी हाताला चिमटे काढून बघितले! त्याच्या खुणा दाखवतोय मी! आता बसला विश्वास? म्हटलं ना, हार कर जीतनेवाले को ही बाजीगर कहते है!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Nagaradhyaksha Results 2025 : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये कुणी मारली बाजी? कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष? वाचा संपूर्ण यादी

Crime: धक्कादायक! अनेक तरुणींसोबत तब्बल लग्नाची रात्र ५५ वेळा साजरी; वधूसोबत नको ते कृत्य, एका वराची हादरवणारी कथा

Vijay Hazare Trophy: ऋतुराज गायकवाड कर्णधार, पृथ्वी शॉही महाराष्ट्र संघात; पहिल्याच सामन्यात शुभमन-अभिषेकच्या संघाला भिडणार

Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?

Latest Marathi News Live Update: विजय जल्लोष मिरवणुकीवेळी लागली मोठी आग

SCROLL FOR NEXT