scitech
scitech 
संपादकीय

आपण जे पदार्थ खातो, त्यात नेमके आहे तरी काय?

डॉ. पल्लवी श्रीरंग जमदग्नी

आपण खात असलेल्या अन्न पदार्थांमध्ये कोणते रासायनिक घटक आहेत. यांची आपल्याला जाणीव नसते. हे घटक जाणून घेण्यासाठी एखादी चाचणी तयार करता येईल का? या मुद्याचा ध्यास घेऊन खरोखरच अशी चाचणी तयार करण्यात आली.

ए खादे ‘चिप्स’चे, ‘कुरकुरे’चे किंवा ‘लेज’चे पाकीट खाऊन फेकून देताना आपण त्यावरील माहिती वाचतो का? त्यात कुठले रासायनिक द्रव्य आहे हे पाहतो का? ते सुरक्षित आहेत का हे कुठे तरी तपासले जाते हे तरी आपल्याला माहिती आहे का? या पैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येतील. पण एका माणसाला या चिप्समधील रसायने तपासता येतील का? या विचाराने पछाडले. त्यासाठी आवश्‍यक संशोधन त्याने केले आणि त्याची चाचणी तयार केली. ती ४८ वर्षांपासून काहीही बदल न करता अजूनही वापरली जातेय. एकच चाचणी पर्यावरणातील घटक, औषधे किंवा रसायन यांची सुरक्षितता ठरवण्यासाठी वापरली जातेय. त्या चाचणीचे नाव आहे ‘एम्स टेस्ट’ आणि शास्त्रज्ञाचे नाव आहे ब्रूस एम्स! ही चाचणी प्रसिद्ध झाली १९७१मध्ये.
एम्स आज नव्वद वर्षांचे आहेत आणि अजूनही त्यांचा निवृत्त होण्याचा विचार नाही. ‘ओखामा चिल्ड्रन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ने त्यांच्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा निर्माण केली आहे.

ब्रूस यांनी नक्की काय काम केले? तर त्यांनी जनुकांना नुकसान करणारे घटक कसे शोधायचे याची चाचणी तयार केली. मूलतः जनुकांत बदल झालेले जिवाणू (म्युटेटेड) जर अशा घटकांच्या (जिनोटोक्‍सिक) सान्निध्यात आले तर, ते पुन्हा ‘म्युटेट’ होऊन जिवंत राहतात. ज्यांच्यात बदल होत नाही असे जिवाणू मारतात. म्हणजेच रसायनांच्या सान्निध्यात ‘प्लेट’वर जर जिवाणूंचा समूह तयार झाला तर ते रसायन जनुकांना हानी करणारे आहे हे नक्की होते. याला म्युटेशन म्हणतात. म्युटेशन हे कॅन्सर होण्याचे मुख्य कारण आहे हे सर्वमान्य नव्हते. ब्रूस काम करत होते ते जिवाणूंवर. त्यामुळे जिवाणूंवर केली जाणारी चाचणी माणसामध्ये होणारे ‘म्युटेशन’ कसे तपासू शकेल या एका शंकेपायी त्यांना अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या ‘नॅशनल कॅन्सर रिसर्च’ने मदत नाकारली. पुढे थोडे प्रयत्न केल्यावर त्याला अणु संशोधन केंद्राकडून मदत मिळाली. या आर्थिक मदतीमुळे ब्रूस यांनी ‘टेस्ट फोर म्यूटाजनीसीटी’ तयार केली. त्यात जवळजवळ अडीचशे रसायने तपासली. काहींची कर्करोग घडवून आणण्याची क्षमता सिद्ध झाली होती आणि काहींची अजून व्हायची होती. तसेच सगळेच ‘म्युटेशन’ करणारे कर्करोग घडवून आणतात का? किंवा कर्करोग निर्माण करणारी सगळीच रसायने ‘म्युटेशन’ करतात का हेही तपासायचे होते. ब्रूस यांनी सगळी कर्करोगकारक रसायने तपासली, त्यातील नव्वद टक्के रसायने ‘म्यूटाजनिक’ निघाली. म्हणजेच ही चाचणी यशस्वी ठरत होती.

ब्रूस यांना अशा चाचण्यांचा प्रचार करायचा होता म्हणून त्यांनी ‘पेटंट’ घेतले नाही. त्याला वाटत होतं थोडक्‍याच वर्षात ही चाचणी मागे पडेल, नवीन काही येईपर्यंत हे ठीक आहे. पण तसे झाले नाही. थोडेफार बदल झाले पण चाचणीची पद्धत अजूनही बदललेली नाही. त्यांच्या एका विद्यार्थिनीने मात्र असे काही ‘स्ट्रेन’ तयार केले की ज्यामुळे प्रत्येक प्रकारचे ‘म्युटेशन’ बघता येईल. या गोष्टीचे पेटंट घेतले गेले. ही चाचणी फारशी प्रसिद्ध होणार नाही असे खुद्द एम्स यांना वाटत होते. परंतु झाले उलटेच. ही चाचणी ९० टक्के अंदाज खरे ठरवते म्हटल्यावर रासायनिक प्रक्रिया उद्योग, खाद्य पदार्थांचे उद्योग (ज्यात मोठ्या प्रमाणावर ‘प्रिझर्व्हेटिव्ह’ वापरले जातात.), औषध उद्योग आदींसाठी ही चाचणी मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली.

अमेरिकी सरकारने प्रचंड प्रयत्न करूनही अमेरिकी माणसांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता का भासते? याचा विचार ब्रूस यांनी केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की खाण्यापाण्याच्या सवयी कारणीभूत आहेत. यातूनच ब्रूसने एक नवीन कल्पना जगाला दिली ती म्हणजे ‘ट्रायेज थेअरी’! त्याचे म्हणणे आहे की हे विटामिन्स, मिनरल्स किंवा अमिनो एसिड सर्वांत आधी सर्वांत महत्त्वाचे काम काय आहे ते करतात. आपले शरीरच ते ठरवते. उदा. जीवनसत्त्व ‘ड’ सर्वांत आधी हाडांची निरोगी वाढ होण्याचे कार्य करेल, किंवा जीवनसत्त्व ‘क’ हे स्कर्वी होऊ नये म्हणून काम करील, परंतु या व्यतिरिक्त या घटकांची अजूनही अशी काही कामे आहेत जी त्यांनी केली नाहीत किंवा त्यांची कमतरता असली तर त्याचा प्रभाव लगेच दिसणार नाही, पण कालांतराने नक्कीच दिसेल. त्यापैकी एक परिणाम कर्करोग ही असू शकतो. ब्रूस यांच्या या सिद्धांताला आता मान्यता मिळत आहे.

(लेखिका क्षेत्रीय आयुर्वेदीय मूलभूत संशोधन संस्था, कोथरूड, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT