संपादकीय

सुखी माणसाची मनोभूमी 

डॉ. विद्याधर बापट

सुखी आणि आनंदी होण्याची आपल्या सगळ्यांची धडपड असते. किंबहुना आनंद आणि मन:शांती मिळविण्यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असते.. आपल्याला कायमस्वरूपी आनंदी राहता येतं का? जीवनातला प्रत्येक क्षण आपण खऱ्या अर्थाने जगू शकतो का? ह्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत. मग त्यासाठी आपल्याला विशिष्ट दिशेने प्रयत्न करावे लागतील. मनाच्या सवयीची, विचारांची धाटणी बदलायला लागेल. जगण्याविषयीचा दृष्टिकोन बदलायला लागेल. हे मनाचं रिप्रोग्रॅमिंग असेल. विशिष्ट पद्धतीनं मनाची मशागत झाली, की मग तेथे आनंदाची, समाधानाची बीजं पेरली जातील. सकारात्मकता, भौतिक जीवनातील यश आणि आंतरिक सुखाची निरंतर शक्‍यता निर्माण होईल. मनाची मशागत करताना काही भावना, विचार आपला भागच बनवून टाकाव्या लागतील. पहिली भावना आहे कृतज्ञतेची. कृतज्ञतेची भावना अंत:करणात रुजवायची असेल, तर आपल्याला प्रथम आत्ता ह्या क्षणी घडत असलेल्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. फोकस करायला हवं. आणि नकारात्मक गोष्टी दुर्लक्षित करायला हव्यात. म्हणजेच ग्लास अर्धा भरलेला आहे ह्यावर लक्ष द्यायला हवं. जे घडतंय त्यात चांगलं काय आहे ते पाहायला हवं. हे एकदा जमलं की कृतज्ञ कशाबद्दल रहायचं हे कळू शकेल.

सुखाच्या, आनंदाच्या प्राप्तीच्या वाटेवरचं पहिलं सूत्र म्हणजे ‘कृतज्ञता बाळगा’. प्रत्येक क्षणी आपल्या आसपास काहीतरी चांगलं घडत असतंच. त्याबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगा. कृतज्ञतेच्या भावनेत विलक्षण ताकद असते. नेहमी आनंदी व्हायचं आणि राहायचं असेल, खऱ्या अर्थाने सुखी समाधानी व्हायचं असेल, तर मनात काही बीजं पेरायला हवीत. मनाची धारणा बनवायला हवी. सकारात्मक विचारसरणी नुसता सकारात्मक विचार करून अमलात आणता येत नाही. कारण मग ती फार काळ टिकत नाही. त्यासाठी आपल्या आत काही गुणवैशिष्ट्ये निर्माण व्हायला हवीत. त्यातले पहिले म्हणजे कृतज्ञता.

कृतज्ञतेचा सराव - सरावासाठी पुढील गोष्टी आपण करू शकतो- १) काही प्रश्न स्वत:ला रोज सकाळी विचारूया- माझ्या आयुष्यात सध्या काय चांगलं चाललंय ? आजचा दिवस आनंदी जावा ह्यासाठी मी काय काय करू शकतो ? मी अशा काही गोष्टी आज करू शकतो का, की ज्यायोगे मला आनंद मिळेल आणि दुसऱ्यालाही मदत होईल? २) आसपास जे घडतंय त्यात चांगलं काय घडतंय हे वेचण्याची,पाहण्याची मनाला सवय लावणं. ३) आयुष्यात जे चांगलं घडेल त्याचं मनापासून स्वागत करणं. त्याचा असोशीने आनंद घेणं. आयुष्य हा एक आनंदमय चमत्कार आहे. एकूणच सगळं यच्चयावत सजीव- निर्जीवाचं अस्तित्व ही एक वैश्विक प्रक्रिया आहे आणि आपला ह्या त्यात सहभाग आहे, ह्याचा आनंद वाटायला हवा.

अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे  ‘There are two ways to live your life. One is as though nothing is a miracle. The other is as though everything is a miracle.` आपण हा आनंदमय चमत्कार मानायला हवा. लहान लहान गोष्टींमध्ये, यशामध्ये भरपूर आनंद मानणं- घर घेतलं, पगार वाढला, मुलगा इंजिनियर झाला, भौतिक समृद्धी आली ह्या आनंद देणाऱ्या मोठया गोष्टींमध्ये आनंद मानावाच; परंतु रोज सहज घडणाऱ्या लहान लहान गोष्टीही एन्जॉय करायला शिकाव्यात. उदा. बदलणारे निसर्गाचे रंग, वाऱ्याची मंद झुळूक, आपल्या आसपासची माणसं, त्यांच्या आयुष्यातले छोटे-मोठे आनंद. ४) आयुष्य छोटं आहे. कुठल्याही क्षणी मृत्यू येऊ शकतो, हे कटू सत्य आहे. त्यातील लक्षार्थ लक्षात घेतला तर हे वाक्‍य अशुभ वाटणार नाही. आता ह्या लहान आयुष्यातला पहिला महत्त्वाचा क्षण म्हणजे आपला जन्म तर घडून गेला आहे. दुसरा महत्त्वाचा क्षण म्हणजे शेवटाचा. जन्म आणि मृत्यू ह्या दोन महत्त्वाच्या क्षणांमधलं आपलं आयुष्य आनंदी घालवायचं, तर मिळणारा प्रत्येक क्षण साजरा करायला हवा. हे समजून घेतलं की कृतज्ञतेनं मन भरून येईल.

आयुष्य सुखी होण्यासाठी जी गुणवैशिष्ट्ये, भावना आपल्यात रुजायला हव्यात, त्यात अस्तित्वाप्रती, जे जे मिळतंय त्याप्रती कृतज्ञता वाटणं हे प्रथम आहे. त्यानंतर ह्या मार्गावर साक्षीभाव जोपासाणं, mindfulness, अहंकाराचं निर्मूलन, सकारात्मक दृष्टिकोन, व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास, इच्छाशक्तीचा विकास, स्वत:वर प्रेम करणं वगैरे बरेच सोपान आहेत. व्यक्तीमध्ये संपूर्ण सकारात्मक परिवर्तन (Positive Transformation) घडू शकतं. न्यूरोप्लॅस्टिसिटीची संकल्पना याला दुजोरा देते. फक्त हे करण्याची तीव्र इच्छाशक्ती हवी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT