art sakal media
संपादकीय

कलाबहर : कलेचा निखळ आनंद घ्यावा

गेले काही महिने अनेक जेष्ठ चित्रकार, कलाशिक्षक या सर्वांशी बोलताना एक गोष्ट नक्की पटली आहे, की चित्रकार घडतो तो अवतीभवतीच्या सर्व घटकांमुळे

गायत्री देशपांडे

गेले काही महिने अनेक जेष्ठ चित्रकार, कलाशिक्षक या सर्वांशी बोलताना एक गोष्ट नक्की पटली आहे, की चित्रकार घडतो तो अवतीभवतीच्या सर्व घटकांमुळे. त्यांचे पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, संपर्कात येणारे सर्वजण, एवढेच नाही तर त्यांनी वाचलेल्या गोष्टी, घेतलेले अनुभव, बघितलेली स्वप्न, सिनेमे, वाचलेल्या दैनंदिन वार्ता या सगळ्याचा त्यांच्या घडणीत वाटा असतो. चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला, की शिक्षकांबरोबरच सर्व कर्मचारी, शिपाई, ग्रंथपाल, चहाचा टपरीवाला हे सगळे त्याच्या ‘इकोसिस्टिम’चा भाग बनतात... आणि हो कला साहित्याचे दुकानदारही! त्यांच्यावर तर या होतकरू चित्रकारांची भिस्त असते.

कित्येकदा हे दुकानदार या मुलांचे चक्क पालकत्व स्वीकारतात. त्यांच्यातील नाते केवळ व्यापारी-ग्राहक नसतेच. ते त्याहून अधिक घनिष्ट असते. विशेषतः ग्रामीण भागातून शिकायला आलेल्या मुलांना तर या नात्याचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. पुण्यातील ‘अभिनव कला महाविद्यालया’समोरचे बोराणा स्टोअर, मॅक्सा, मग आर्टिस्ट कट्टा, व्हीनस ट्रेडर्स इत्यादींचा यासंदर्भात उल्लेख करता येईल. अर्थात, प्रत्येक शहरात अशी उदाहरणे आहेत. आज अनेक दिग्गज कलाकारांच्या प्रवासात या सर्वांचे योगदान आहे असे मला वाटते. महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर ‘चित्रकाराला’ आधार असतो कलादालनांचा, जाणकार नागरिकांचा, कला संस्थांचा, कला संग्राहकांचा. चित्रकार हा आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. या सदरातील लेखांमधून कुठेतरी आपल्याला हे लक्षात आले असेल, की मुळात चित्रकाराची चित्र काढण्याची प्रेरणा काय असते ते. सुंदर चित्रण या पलीकडेही चित्रकला आहे.

लहानपणापासूनच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात चित्रकलेचे मोठे योगदान आहे. ती आपली नैसर्गिक गरज आहे. आपण ही जाणीव ठेवून येणाऱ्या पिढीला अभिव्यक्तीची मोकळीक दिली तर आपला समाज नक्की समृद्ध बनेल. एकाच पद्धतीची चित्र ‘योग्य’ आणि बाकी ‘अयोग्य’ हा नियमच मुळात नसावा. प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने चित्रातून व्यक्त होणे महत्त्वाचे. ‘सौंदर्य’ म्हणजे काय, ते कशात आहे हे समजणे व समजावणे गरजेचे वाटते. याचे कारण सौंदर्याच्या कल्पना व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात आणि ते स्वातंत्र्य आपल्या सर्वांनाच असावं. चित्र काढणं ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेत आनंद आहे, समाधान आहे. तंत्र हा त्यातला एक भाग झाला; पण अभिव्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे. सृजनातला आनंद हा शब्दांत व्यक्त होणे कठीणच.

‘कलाबहर’ या सदरातून माझा प्रयत्न तुम्हा वाचकांपर्यंत पोहोचावा आणि लहान-मोठे सर्वांनीच या कलेची जोड आपल्या आयुष्याला द्यावी, एक सौदर्यदृष्टी घडावी अशी आशा आहे. आता या दृष्टिकोनाला, सौंदर्यभानाला अजून थोड़ा आकार यावा याकरिता काही ज्येष्ठ चित्रकार, अभ्यासक त्यांचे विचार, त्यांचे या विषयातील ज्ञान, मत आपल्या सर्वांपर्यंत त्यांच्या काही लेखांमधून पोहोचवणार आहेत. या पुढे कुठल्याही चित्रकाराचे फक्त एकच चित्र न बघता अनेक चित्र बघून त्याचा प्रवास समजून घ्यावा, त्याच्या कामावर प्रभाव करणाऱ्या अनेक गोष्टींची आणि त्यातून घडलेल्या त्याच्या कलाकृतींवर चर्चा व्हावी, असे वाटते. चांगले /वाईट याचे निकष बाजूला ठेवून कलेचा निखळ आनंद घेतला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळवर आणखी एक मोक्का, तरुणावर केला होता कोयत्याने हल्ला

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT