Sujata Bajaj Sakal
संपादकीय

कलाबहर : जोरकस रेषांची उत्कट भाषा

चित्रकर्ती सुजाता बजाज यांची चित्रं म्हणजे काळ्या रंगातून बाहेर येणारा तेजस्वी लाल, केशरी, पिवळा रंग आणि जोरकस रेषा यांची उत्कट मांडणी.

गायत्री देशपांडे

चित्रकर्ती सुजाता बजाज यांची चित्रं म्हणजे काळ्या रंगातून बाहेर येणारा तेजस्वी लाल, केशरी, पिवळा रंग आणि जोरकस रेषा यांची उत्कट मांडणी. अमूर्त शैलीतील चित्रकारांमधील अग्रस्थानी असलेलं हे नाव. बालपणी तिचे कुटुंब आचार्य विनोबा भावे यांच्या अगदी जवळचे होते. त्यांच्या प्रोत्साहनाने तिची प्रतिभा खुलून आली. पुण्यातील चित्रकला शिक्षणानंतर आदिवासी कलेवर पीएच.डी करताना ज्येष्ठ चित्रकार एस. एच. रझा यांच्याशी तिची भेट झाली. त्यांनी तिला पॅरिसला जाऊन तेथील कलाजगताचा अनुभव घेण्यास प्रेरित केले.

धडपड्या स्वभावाच्या सुजाताने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला व १९८८पासून तिच्या आयुष्याचे नवे पर्व पॅरिसमध्ये सुरू झाले. तांत्रिक शिक्षणाबरोबर रझांचे मौल्यवान मार्गदर्शन तिला लाभले. आदिवासी कलेचा गाढा अभ्यास व त्यावरचे प्रेम तिच्या सुरुवातीच्या काळातील चित्रांमध्ये स्पष्ट दिसते. चित्र करणे हे सुजातासाठी ध्यानस्थ होण्यासारखेच आहे. तासन्‌तास ती तिच्या चित्रात एकरूप आणि ध्यानमग्न असते. जणू त्यासाठीच तिचा जन्म झालाय. ‘रंग’ हा तिच्या जगण्याचाच अविभाज्य भाग आहे. सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात वास्तववादी, मानवाकृती असलेले चित्र करणाऱ्या सुजाताला अमूर्त चित्रांचे, त्या शैलीचे आकर्षण होते. तिची चित्रंही अमूर्त होत गेली. तिच्या चित्रांत जणू निर्मिती, विश्व व त्यामागची ऊर्जाच रसिकाला दिसते. तिचे व्यक्तिमत्त्वही तसेच ऊर्जात्मक आहे. रंग व रेषांनी निर्माण होणारा एक प्रकारचा ‘ताण’ तिची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहचवतो. ‘‘मी माझ्या चित्रांत केवळ एक रेषा किंवा ठिपका किंवा रंग असे बघतच नाही. मी बघते तो पूर्ण चित्राचा पृष्ठभाग आणि त्याच्या परिपूर्णतचा अनुभव मी घेते,’’ असे ती सांगते. तिच्या चित्रांतील ॐ आणि संस्कृत श्लोकांचे अस्तित्व या वैश्विक निर्मितीच्या ऊर्जेच्या अनुभवाला आणखी परिणामकारक बनवतात.

‘‘संस्कृत श्लोकांना मी त्या अवकाशाचा एक भाग म्हणून वापरते, एखाद्या रंगासारखाच. त्यात माझ्या भूतकाळापासून ते वर्तमानापर्यंत व भविष्याचा प्रवासही दडला आहे. माझ्या परंपरेशी संबंधित हा प्रवास आहे. हे सर्व श्लोक कोलाजसारखे वापरले आहेत मी.. त्यातून एक सकारात्मक भाव निर्माण होतो. त्यातून घडणारे दृश्य-कंपन महत्त्वाचे आहे माझ्यासाठी. ते वाचायची गरजच नाही.’’ सुजाताच्या चित्रांतील रेषा जोरकस आणि सरळ दिसतात. तिलाही रेषा व रंगांची भाषा पॅरिसमधे सापडली. तिच्या हातात एक वेगळेच कसब आहे रेषा काढण्याचे. त्याचे श्रेय ती पुण्यातील कलाशिक्षक ज्येष्ठ चित्रकार मुकुद केडकरांना देते. रेषांमधून एक वेगळीच तीव्रता तिच्या चित्रांत असते. चित्रांतील वर्तुळही तितकेच आकर्षक दिसते. ती लाल, केशरी, काळा या रंगांत अक्षरशः खेळते. त्यांच्यासोबत जगते. तिला अंतर्बाहय असे या रंगांनी व्यापून टाकले आहे. एक ‘कलरिस्ट’ आहे ती. लाल रंग तर विश्वाचंच प्रतीक आहे तिच्यासाठी.

काळ्यातून तेजस्वीपणे बाहेर येणारा तिचा लाल शक्तिशाली आहे. ‘रसिकांनी माझी चित्रं मोकळ्या मनाने पाहावी, त्यांचा आनंद घ्यावा, माझ्या चित्रांमधून त्यांना आशा व प्रेरणा मिळावी. एक संपूर्ण वेगळा अनुभव मिळावा’ असं तिला वाटतं. तिच्या अमूर्त चित्रांइतकेच आकर्षक आहेत तिच्या ‘गणेश मालिके’तील मिश्र माध्यम व शिल्पकृती. आज जगभरात कलासफर करणारी सुजाता मनाने पूर्ण भारतीय आहे. तिचे भारतीयत्व तिच्या कामात आणि व्यक्तिमत्वात अगदी सहज उतरले आहे. तिची जन्मभूमी असलेल्या राजस्थानचे रंगवैभव तिच्या कामात झळकते. आपल्या मुळांना ती धरून आहे. चित्रकलेच्या शुद्ध साराला ती वचनबद्ध आहे. उच्च विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, आध्यात्मिक गुरु यांच्या सान्निध्यात वाढलेल्या सुजातावर उत्तम संस्कार झाल्यामुळे तिचे व्यक्तिमत्व फुलले. जगभरात तिची अनेक कलाप्रदर्शने झाली आहेत. सुजाता बजाजची चित्रं म्हणजे अंदाधुंद रेषा व रंगांच्या खेळात सुसंवाद व समतोलाचा शोधच!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail: मोनोरेलचा ट्रायल रनदरम्यान अपघात! मग नियमित प्रवासी सेवेचं काय? सिग्नल फेल की सिस्टम फेल? मुंबईकरांचा सवाल

अहमदाबाद सारखी घटना, विमान धावपट्टीवर असतानाच लागलेली आग, उड्डाणानंतर लगेच कोसळलं; धक्कादायक VIDEO समोर

ऐतिहासिक निकाल! 'अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार'; नराधमाला ‘मृत्यूपर्यंत जन्मठेप’; वाशीम न्यायालयाचा निकाल..

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील ऊसदर आंदोलनात भाजपचा सहभाग

Guru Nanak Jayanti 2025: गुरु नानक जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा मंगल शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT